Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेसह पायाभूत विकास कामांतून संगमनेर समृद्ध; श्रेय फक्त बाळासाहेब थोरात यांनाच – खा. सुळे
राजकारण

निळवंडेसह पायाभूत विकास कामांतून संगमनेर समृद्ध; श्रेय फक्त बाळासाहेब थोरात यांनाच – खा. सुळे

यापुढील काळात तालुका कायम त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – थोरात परिवाराने सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राची सेवा केली असून सर्वांना सोबत घेऊन जाणारे, अत्यंत स्वच्छ व पारदर्शी काम करणारे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच संगमनेर तालुक्याची सर्व क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार व संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी काढले.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रविवारी संगमनेरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सुधीर म्हस्के, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि अमृत उद्योग समूहातील अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, नवीन प्रशासकीय इमारत, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी बँक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ आणि अमृतेश्वर मंदिर यासह सर्व सहकारी संस्थांची पाहणी केली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात स्वच्छ व पारदर्शक कामातून देशाला दिशा दिली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम होत आहे. येथील अद्ययावत साखर कारखाना, दूध संघ, बँक या सर्व सहकार संस्थांनी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. येथील सहकार चळवळ अत्यंत पारदर्शीपणे काम करत असून, ती संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरावी अशी आहे. या सहकारामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते म्हणून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात मोठे काम केले आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवून हा तालुका शेती, सहकार, दुग्ध व्यवसाय, शिक्षण, समृद्ध बाजारपेठ, मोठमोठी विकास कामे आणि प्रगतीतून अग्रेसर बनवला आहे. कोणतेही काम एका दिवसात होत नाही, त्यासाठी कष्ट आणि मेहनत लागते. थोरात यांनी एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने काम केले. सत्ता येते आणि जाते, मात्र लोकनेतृत्व फक्त निवडणुकीपुरते नसून ते जनतेच्या हृदयात असते. बाळासाहेब थोरात हे कायम जनतेच्या हृदयात आहेत, अशा शब्दांत त्यांनी थोरात यांच्या नेतृत्वाचा गौरव केला.

सहकार क्षेत्रात इतकी अद्ययावत आणि वैभवशाली इमारत फक्त संगमनेरमध्येच उभी राहिली. निळवंडे धरण व कालव्यांसाठी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास ठेवला नाही. ज्यांनी काम केले नाही, अशी मंडळी आता श्रेय घेत आहेत. परंतु जनतेला खरे माहिती आहे. संगमनेर तालुक्यात उभ्या राहिलेल्या विविध वैभवशाली इमारती, पायाभूत सुविधा, रस्ते, गावोगावी विकासाच्या योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि समृद्ध बाजारपेठ हे सर्व थोरात यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाले आहे. यापुढील काळात तालुका कायम त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 773
अमृत उद्योग समूह बाळासाहेब थोरात सदिच्छा भेट सुप्रिया सुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.