Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सामाजिक

उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे यासाठी मध्य प्रदेशमधील माधवपूरच्या धर्तीवर पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते. मात्र, सत्तांतरानंतर सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले; मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. भोजापूर चारी कामासाठी पाठपुरावा करून या भागातील गावांकरिता सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्या असून, या योजनांवरील स्थगिती तातडीने उठवून पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी. आर. चकोर, शिवसेनेचे अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष सांगळे, अनिल कांदळकर, सखाराम शरमाळे, अनिल घुगे, सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार, अशोक मुळे, चेअरमन संतोष काळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब जगताप, ज्ञानदेव काळे, सचिव संजय गडाख, संपत शिरसाठ, रामनाथ शिरसाट, कैलास गिरी यांच्यासह ग्रामस्थ व शिवभक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कधीही भेदभाव केला नाही; सर्व जातीधर्माच्या लोकांना समान स्थान दिले. हा मानवतेचा विचार युवकांनी पुढे नेला पाहिजे. निमोण नान्नज दुमाला पंचक्रोशीतील गावांना निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी आपण उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे यासाठी मध्य प्रदेशमधील माधवपूरच्या धर्तीवर पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते. मात्र, सत्तांतरानंतर सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या लोकांना वेळीच रोखा, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आपण निधी मंजूर केला आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सहकार्यातून मोठे काम होत असून, काकडवाडीतील सोसायटीची इमारत अत्यंत सुंदर आहे.

प्रास्ताविक सरपंच जनार्दन कासार यांनी केले, सूत्रसंचालन सुनील कासार यांनी, तर सोसायटीचे चेअरमन संतोष काळे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 397
काकडवाडी बाळासाहेब थोरात भाऊसाहेब वाकचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.