Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसपी साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याला ‘कायद्याचा बालेकिल्ला’ बनवा; आ. सत्यजीत तांबे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
गुन्हेगारी

एसपी साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याला ‘कायद्याचा बालेकिल्ला’ बनवा; आ. सत्यजीत तांबे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र

नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानासारखा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आदर्शवत उपक्रम तातडीने राबवावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एक सविस्तर पत्र लिहिले असून यात त्यांनी ‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.

अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना आमदार तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नुकतेच जिल्ह्याला देण्यात आले आहे. अहिल्यादेवींचे उत्तम प्रशासनाचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले आहे, परंतु त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आता गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, दरोडे, अवैध धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढल्याने सामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

ड्रग्सचा वाढता विळखा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – पत्रात विशेषतः ‘ड्रग्स’च्या वाढत्या घटनांवर बोट ठेवण्यात आले आहे. ड्रग्स अगदी खेडोपाडी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. याला पोलिसांचे संरक्षण आहे की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशा गंभीर शब्दांत तांबे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाहतूक कोंडी आणि पोलीस यंत्रणेची निष्क्रियता – याव्यतिरिक्त, अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये वाहतुकीच्या (ट्रॅफिक) मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ट्रॅफिक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे की नाही अशी सर्वसामान्यांची भावना झाली असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे. तसेच, जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत झाल्याची बाब जिल्ह्याच्या समाज व्यवस्थेसाठी धोकादायक ठरणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवर शंका – स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यक्षमतेवरही तांबे यांनी शंका उपस्थित केली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आहे की नाही आणि असेल तर ती नेमकी काय करते, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकंदरीत जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस प्रशासनाचा धाक संपलेला आहे, असे सांगत तांबे यांनी ‘आता पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे’ अशी मागणी केली आहे. यापूर्वी २९ जुलै २०२५ रोजी देखील कायदा सुव्यवस्थेबाबत स्मरणपत्र दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

आमदार तांबे यांनी पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम बनवून पूर्वीप्रमाणे हा जिल्हा आदर्श, गुन्हेगारीमुक्त करावा. तसेच, नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानासारखा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आदर्शवत उपक्रम तातडीने राबवावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 661
ड्रग्स सत्यजित तांबे सोमनाथ घार्गे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.