संगमनेर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण २ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, यामुळे ग्रामीण व आध्यात्मिक पर्यटनाला नवी ऊर्जा मिळणार असल्याची माहिती खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या निधीतून देवकौठे येथील जगदंबा माता मंदिरासाठी ५० लाख, तर तळेगाव, गुंजाळवाडी, सोनोशी, काकडवाडी, संगमनेर बु. (खंडोबा मंदिर), लोहारे, निमज, आणि धांदरफळ खुर्द येथील धार्मिक स्थळांसाठी उर्वरित निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत परिसरातील सुविधा उभारणी, पायाभूत रचना सुदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, व प्रवेशमार्ग सुधारणा यांसारख्या कामांवर भर दिला जाईल. ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कठोर अटी लागू केल्या आहेत.
या विकासामुळे भाविक, पर्यटक आणि स्थानिकांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध होऊन, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगारसंधी वाढण्यास मदत होईल. आमदार खताळ यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत. संगमनेर तालुका लवकरच राज्याच्या धार्मिक व ग्रामीण पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.
संगमनेर तालुक्यात पर्यटन विकासासाठी २ कोटींच्या कामांना मान्यता, आमदार खताळ यांच्या प्रयत्नाला यश
आमदार खताळ यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत.





प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत परिसरातील सुविधा उभारणी, पायाभूत रचना सुदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, व प्रवेशमार्ग सुधारणा यांसारख्या कामांवर भर दिला जाईल. ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कठोर अटी लागू केल्या आहेत.
