Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन: पाकला धडा शिकवणाऱ्या स्व.इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान! माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र संवाद विशेष

अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन: पाकला धडा शिकवणाऱ्या स्व.इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान! माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे प्रतिपादन

पांडुरंग पाटील घुले यावेळी बोलताना म्हणाले की, आज देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मनभेद निर्माण झाले आहेत. जाती-जातीमध्ये भांडणे लावले जात आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (प्रतिनिधी)

बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व धाडसी व पराक्रमी होते. देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर पंतप्रधान होत्या, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शक्तीस्थळ येथे देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. तांबे बोलत होते.

डॉ. तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल नितांत आदर होता. इंदिराजींच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी याकरिता नवी दिल्लीच्या धर्तीवर अमृत उद्योग समूहांमध्ये त्यांनी शक्तीस्थळ निर्माण केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध तज्ञ व्यक्तींची व्याख्याने या ठिकाणी आयोजित केली जातात.

इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती, विज्ञान क्रांती घडवणाऱ्या इंदिराजींनी पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशची निर्मिती केली. बँकांच्या राष्ट्रीयकरणासह अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले आणि स्वकर्तृत्वावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण केला.

तसेच, सरदार वल्लभभाई पटेल यांनी ६०० संस्थानांचे देशात विलीनीकरणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचे डॉ. तांबे यांनी नमूद केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यावेळी बोलताना म्हणाले की, आज देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मनभेद निर्माण झाले आहेत. जाती-जातीमध्ये भांडणे लावले जात आहेत. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. फक्त जाहिरातबाजीमधून कणखरता दाखवली जाते, मात्र सध्याचे सरकार पराभूत मानसिकतेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. बाबा खरात यांनीही यावेळी आपले मत मांडले. देशाची अखंडता व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बलिदान देणाऱ्या इंदिराजींचे जीवनकार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, ॲड. नानासाहेब शिंदे, आर. बी. रहाणे, संपतराव गोडगे, दिलीप नागरे, अंकुश ताजने, प्रा. बाबा खरात, गुलाबराव देशमुख, भास्करराव आरोटे, संभाजी वाकचौरे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 591
थोरात कारखाना सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.