Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला गंभीर; संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसात भीषण दहशत!
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला गंभीर; संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसात भीषण दहशत!

तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. याच मालिकेतील आणखी एका ताज्या घटनेत, शनिवारी (१ नोव्हेंबर) हिवरगाव पावसा येथे एका ३० वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला असून, ती महिला गंभीर जखमी झाली आहे.

अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव असून ही घटना हिवरगाव पावसा शिवारात घडली. महिला आपल्या शेतातून घरी परतत असताना बिबट्याने दबा धरून तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत, यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. महिलेने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरड्यानंतर परिसरातील नागरिक तात्काळ धावून आले, यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिकांनी वारंवार बिबट्याच्या दर्शनाची तक्रार करूनही वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, तसेच जखमी महिलेला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच एकविरा फाउंडेशनच्या जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जखमी महिलेची भेट घेत तिला धीर दिला. तसेच नरभक्षक बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी त्यांनी वनविभागाकडे केली.

तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 848
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.