Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर ड्रग्स प्रकरण: राहुल गांधी समर्थक संघाकडून (RGSS) सखोल चौकशीची मागणी!
गुन्हेगारी

संगमनेर ड्रग्स प्रकरण: राहुल गांधी समर्थक संघाकडून (RGSS) सखोल चौकशीची मागणी!

गुन्ह्याचा तपास आधुनिक पद्धतीने व्हावा यासाठी, आरोपी व्यक्तीच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट्स इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे का, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. शेवटी, या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर संशयित व्यक्तींच्या शोधात तपास चालू आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहरात उघडकीस आलेल्या ड्रग्स इंजेक्शन विक्री प्रकरणासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने कठोर भूमिका घेत पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांना एक निवेदन देत या देशविघातक कृत्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासात आणखी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संगमनेर शहरात ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप’ नावाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी औषधे (मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन्स) विकणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात राजकीय दबाव आल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेत गुन्हा दाखल केला.

RGSS ने पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर, त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळावी, यासाठी त्यांनी तपासाच्या महत्त्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) पोलिसांना विचारणा केली की, सध्या चालू असलेल्या तपासात आरोपीसह आत्तापर्यंत किती लोकांना अटक करण्यात आली आहे आणि अटक केलेल्या आरोपींकडून नेमकी काय माहिती मिळाली आहे? या ड्रग्सचा मूळ स्रोत कोणता आहे, याचा तपास पोलिसांनी करावा. तसेच, आरोपी व्यक्तीच्या विरोधात यापूर्वी इतर गुन्हेगारी फिर्यादी आहेत का, आणि या ड्रग्सचा पुरवठा इतर व्यक्तींपर्यंत किंवा शहरांपर्यंत आहे का, याची सखोल चौकशी व्हावी.

या गुन्ह्यासाठी इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सामग्री कोठून आणि कशी मिळाली, आरोपीची पोलिस कोठडी किती दिवसांसाठी घेण्यात आली आहे? तसेच, ड्रग्सच्या नमुन्यांची शासकीय रासायनिक संशोधनाकडे पाठवणी करण्यात आली आहे का, आणि त्याचा अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? आदी प्रश्न उपस्थित केले. 

गुन्ह्याचा तपास आधुनिक पद्धतीने व्हावा यासाठी, आरोपी व्यक्तीच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट्स इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे का, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. शेवटी, या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर संशयित व्यक्तींच्या शोधात तपास चालू आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

या प्रकरणातील पुढील प्रगतीबाबत वेळोवेळी पोलिसांना भेटून पाठपुरावा करत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. या संवेदनशील प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई होण्याची अपेक्षा संपूर्ण संगमनेरवासीय व्यक्त करत आहेत.

या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी राहुल गांधी समर्थक संघाचे (RGSS) पदाधिकारी एकत्र आले असून, निवेदनावर सही करणाऱ्यांमध्ये कल्याण जोर्वेकर, राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव आणि मोहसीन खलील शेख यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 709
तपास निवेदन राहुल गांधी समर्थक संघ संगमनेर ड्रग्स प्रकरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.