


संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली आहे. देशमुख यांच्या बदलीमुळे संगमनेरमध्ये सुरू असलेला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांच ग्रहण अद्यापही सुरूच आहे.
देशमुख गेल्या काही दिवसापासून बदलीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा अखेरीस पूर्णत्वास आली आहे. देशमुख यांच्या रिक्त जागेवर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशमुख यांची बदली अहिल्यानगरच्या ए. एच. टी. यु. या शाखेकडे करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस निरीक्षक व तिघा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत केलेल्या अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या पुढील प्रमाणे….
- पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची बदली संगमनेरहून अहिल्यानगर
- पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची बदली पारनेरहून संगमनेर शहर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेतून पारनेर पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर जामखेड पोलीस ठाण्यातून बेलवंडी पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून राजुर पोलीस ठाणे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे राजुर पोलीस ठाण्यातून पारनेर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ नियंत्रण कक्षातून तोफखाना पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तोफखाना पोलीस ठाण्यातून अहिल्यानगर मानव संसाधन विभाग
- पोलीस निरीक्षक संतोष भंडारे बेलवंडी पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा.




