Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयोगाच्या ‘कृपे’ने संगमनेरच्या ‘एअरपोर्ट’ बसस्थानकाचा वर्षभरानंतर मोकळा श्वास! हतबल पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते आचारसंहितेने साधले
पत्रकारिता

निवडणूक आयोगाच्या ‘कृपे’ने संगमनेरच्या ‘एअरपोर्ट’ बसस्थानकाचा वर्षभरानंतर मोकळा श्वास! हतबल पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते आचारसंहितेने साधले

मध्यंतरी संगमनेर मधील एका उद्योगपतीने बस स्थानकावर लागणाऱ्या विविध राजकीय फ्लेक्सच्या माध्यमातून बस स्थानकाच्या होणाऱ्या विद्रूपीकरणासंदर्भात समाज माध्यमावर आपले मत व्यक्त केल्यानंतर या उद्योगपतीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – एकेकाळी ‘एअरपोर्ट’ म्हणून राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होणारे आणि संगमनेर शहराचे वैभव असलेले हायटेक बसस्थानक मागील वर्षभरापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही हतबल ठरलेल्या पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या आचारसंहितेमुळे साधले. आचारसंहिता लागू होताच रातोरात हे सर्व फ्लेक्स हटले आणि तब्बल एक वर्षानंतर संगमनेरच्या या देखण्या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे.

वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’- लोकनेते तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हायटेक बसस्थानक शहराची ओळख आणि अभिमान आहे. प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण ‘सेल्फी पॉइंट’ बनले आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून संपूर्ण बसस्थानक मोठ्या अनाधिकृत फ्लेक्सने झाकले गेले होते. तत्कालीन पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी हे फ्लेक्स काढण्यास हतबल ठरले होते, असे बोलले जात होते.

फ्लेक्स काढण्याचा प्रयत्न करणारे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागले असल्याच्या चर्चा झडल्या होत्या. फ्लेक्समुळे बसस्थानक चौकाचे विद्रूपीकरण तर झालेच; पण अनेकदा कमानी आणि फ्लेक्समुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते. सिग्नल व्यवस्थाही नीट कळत नव्हती, अशी दुरवस्था झाली होती, तरीही प्रशासनाने कारवाई केली नाही.

मध्यंतरी संगमनेर मधील एका उद्योगपतीने बस स्थानकावर लागणाऱ्या विविध राजकीय फ्लेक्सच्या माध्यमातून बस स्थानकाच्या होणाऱ्या विद्रूपीकरणासंदर्भात समाज माध्यमावर आपले मत व्यक्त केल्यानंतर या उद्योगपतीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अखेरीस उद्योगपतीने समाज माध्यमावरील ती पोस्ट हटविल्यानंतर विषय थांबला होता.

थोरात-तांबे यांनी घालून दिला होता आदर्श – या फ्लेक्सबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदावर असताना स्वतः उभे राहून आपले फ्लेक्स काढले होते आणि फ्लेक्सबाजी करू नये असे आवाहन करून राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श निर्माण केला होता. याच आदर्शाचे पालन करत आमदार सत्यजित तांबे यांनीही गेल्या महिन्यात पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व फ्लेक्स स्वतःहून काढून घेतले होते. तरीही, काही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून फ्लेक्सबाजी सुरूच राहिली, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली होती. वारंवार विनंत्या करूनही पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही.

आचारसंहितेचा ‘चमत्कार’ आणि नागरिकांचा आनंद – नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले आणि रातोरात सर्व अनाधिकृत फ्लेक्स हटवण्यात आले. फ्लेक्स हटताच बसस्थानकाचे मूळ सौंदर्य पुन्हा एकदा दृष्टीस पडले. यामुळे व्यापारी वर्ग सुखावला आहे, तसेच सामान्य नागरिक आणि महाविद्यालयीन तरुणांनी याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.

प्रांजली खेमनर (अंभोरे) आणि तनुजा सोनवणे (चिंचोली गुरव) यांसारख्या विद्यार्थिनींनी “अनेक दिवसांनी संगमनेर बसस्थानक पाहायला मिळाले” असे सांगत, मोकळ्या बसस्थानकाजवळ ‘सेल्फी’ काढून संगमनेरकर असल्याचा अभिमान व्यक्त केला. एकूणच, पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे शक्य झाल्याची चर्चा संगमनेर शहरात रंगली आहे.


♠ जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तो परमनंट फ्लेक्स कमान हटविली – जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक-पुणे महामार्गालगत नेत्यांच्या कमानीचे युद्ध रंगले होते. प्रशासनाकडून कोणती कारवाई होत नसल्याने संगमनेरकर देखील हातबलतेने हे कमान युद्ध बघत होते. मात्र काही दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतल्यानंतर थोरात यांची कमान काढून घेण्यात आली तर दुसरी कमान मात्र जैसे थे होती. ही कमान काढण्यात पालिका प्रशासन देखील हातभार ठरले असल्याचे बोलले जात होते. अखेरीस निवडणूक आयोगाच्या कृपेने आचारसंहितेच्या नावाखाली का होईना रिकामा निघाली याबद्दल संगमनेरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,084
निवडणूक आचारसंहिता फ्लेक्स राज्य निवडणूक आयोग संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.