Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरात अमली पदार्थांची तस्करी व अवैध धंद्यांची वाढ; सुसंस्कृत शहराच्या ओळखीला धक्का, नागरिक चिंतेत!
पत्रकारिता

संगमनेर शहरात अमली पदार्थांची तस्करी व अवैध धंद्यांची वाढ; सुसंस्कृत शहराच्या ओळखीला धक्का, नागरिक चिंतेत!

एकूणच, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध धंदे त्वरित थांबवून संगमनेर शहराची शांतता व सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – एकेकाळी ‘सुसंस्कृत व वैभवशाली शहर’ म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेले अवैध धंदे आणि ड्रग्जसह अमली पदार्थांची तस्करी यामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, पालक आणि महिलांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. शहराच्या शांतता व सुरक्षिततेला या घटनांमुळे मोठा धक्का बसला आहे.

शांतता, सुरक्षितता, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण केंद्र, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि समृद्ध बाजारपेठ यांमुळे संगमनेरने राज्यात आपला लौकिक निर्माण केला होता. मात्र, मागील एक वर्षापासून तालुक्यात दडपशाही आणि दहशत वाढत असल्याची भावना निर्माण झाली असून, शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे.

याबाबत ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मुंगसे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, शेजारील तालुक्यांमध्ये घडणाऱ्या या गोष्टी आता संगमनेरमध्येही घडायला लागल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातसुद्धा हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थांसह, ड्रग्ज, इंजेक्शन आणि नशेच्या गोळ्यांचा वाढता प्रसार पाहून पालकवर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक अरविंद गाडेकर यांनी ही बाब तरुण पिढीसाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जोंधळे यांनी या गंभीर विषयाकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे आणि त्यांना संगमनेरसारख्या शहरात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे हे अत्यंत चिंतेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अवैध धंद्यांप्रमाणेच शहराच्या विद्रूपीकरणाचा मुद्दाही चर्चेत आहे. शहरात फ्लेक्सबाजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ज्यांचे कोणतेही सामाजिक योगदान नाही, अशा ‘नव-सामाजिक कार्यकर्त्यांनी’ अनधिकृत फ्लेक्स लावून संगमनेर बस स्थानकासह शहराला विळखा घातला होता. याबद्दल वारंवार आवाज उठवूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, हे अत्यंत चुकीचे होते.

सुदैवाने, आचारसंहिता लागल्यामुळे सर्व फ्लेक्स काढण्यात आल्याने बस स्थानकासह विविध ठिकाणच्या जागांनी मोकळा श्वास घेतला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाने शहराचे विद्रूपीकरण थांबावे यासाठी मोहीम उघडली होती; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फ्लेक्सबाजी कायम राहिली होती.

एकूणच, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध धंदे त्वरित थांबवून संगमनेर शहराची शांतता व सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 726
अनधिकृत फ्लेक्स फ्लेक्स विद्रूपीकरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.