Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कांद्याला कवडीमोल भाव! महायुती सरकार विरोधात संतप्त शेतकऱ्यांचे रस्त्यावरील खड्ड्यात कांदे टाकून ‘अनोखे’ आंदोलन
आंदोलन

कांद्याला कवडीमोल भाव! महायुती सरकार विरोधात संतप्त शेतकऱ्यांचे रस्त्यावरील खड्ड्यात कांदे टाकून ‘अनोखे’ आंदोलन

शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – कांद्याला केवळ 180 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडगाव पान (ता. संगमनेर) येथे आज, (दि. ११ नोव्हेंबर) महायुती सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

वडगाव पान येथील शेतकऱ्यांनी सध्याचे महायुतीचे केंद्र आणि राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार असल्याचा आणि ते शेतकरी विरोधी असल्याचा थेट आरोप केला. राज्य सरकारकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचा दावा करत, संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी ही आमच्याकडून सरकारला मदत, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा तीव्र निषेध केला. कांद्यांनी संपूर्ण रस्ता लाल झाल्याने आंदोलनाची दृश्ये लक्षवेधी ठरली.

या आंदोलनात कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, निलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात, सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात, सतीश थोरात, सुनील थोरात, अविनाश थोरात, गणपत थोरात, आदींसह युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड यांनी राज्य सरकार शेतकरी विरोधी असून गोरगरिबांचे काही घेणे-देणे नसल्याचा आरोप केला. निवडणुकीमध्ये कर्जमाफी आणि हमीभावाच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात कांद्याला 180 रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, म्हणून आम्ही हे खड्डे बुजवण्यासाठी कांदे टाकत आहोत, असे ते म्हणाले.

विक्रम ओहोळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी व महसूल मंत्री असताना शेतकऱ्यांना कायम मदत केली आणि त्यांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली होती, याची आठवण करून दिली. मात्र, आत्ताचे कृषीमंत्री आणि महसूल मंत्री हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याचा आरोप करत सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले.

तर निलेश थोरात यांनी तरुणांच्या समस्यांवर लक्ष वेधले. तरुणांना काम नाही, बेरोजगारी वाढली आहे, शेतीमालाला भाव नाही, अशा स्थितीत केवळ मोबाईलमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 871
आंदोलन कांदे महायुती सरकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.