Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात युवासेनेला गळती! उपतालुकाप्रमुख सचिन साळवे यांचा पदाचा राजीनामा; राजीनाम्यामागे ‘कौटुंबिक कारण’ असले तरी अंतर्गत कुरघोडीचा बळी!
राजकारण

संगमनेरात युवासेनेला गळती! उपतालुकाप्रमुख सचिन साळवे यांचा पदाचा राजीनामा; राजीनाम्यामागे ‘कौटुंबिक कारण’ असले तरी अंतर्गत कुरघोडीचा बळी!

साळवे यांच्यासारख्या जुन्या आणि संघर्षशील कार्यकर्त्याच्या राजीनाम्यामुळे युवासेनेच्या संघटनेला गळती सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –
युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन साळवे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून माघार घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेल्या साळवे यांनी ‘कौटुंबिक कारणांमुळे’ पक्षाच्या कामासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत आपला राजीनामा तालुका, जिल्हाप्रमुखांकडे सुपूर्द केला असला तरी ते पक्षांतर्गत कुरघोडीचे बळी ठरले असल्याची चर्चा आहे.

अधिक माहितीनुसार, साळवे हे युवासेनेमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. पक्षाच्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, त्यांनी पक्षात अनेक चढ-उतार पाहिले असून विविध विषयांवर न्याय मिळवण्यासाठी ते अनेकदा इतरांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलनांत सहभागी झाले आहेत. याच संघर्षातून त्यांच्यावर काही खटलेसुद्धा दाखल झाले आहेत.

पदाचा राजीनामा देत असताना त्यांनी पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी सुख-दुःखात दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपला राजीनामा कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णपणे स्वखुशीने आणि वैयक्तिक कारणामुळे दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

साळवे यांच्यासारख्या जुन्या आणि संघर्षशील कार्यकर्त्याच्या राजीनाम्यामुळे युवासेनेच्या संघटनेला गळती सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,112
युवा सेना राजीनामा सचिन साळवे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.