संगमनेर (प्रतिनिधी): थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा २० वर्षांचा ‘आनंद मेळावा’ उद्या, (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता सायखिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या आनंद मेळाव्यास महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य समन्वयक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या या अभियानाच्या रोपट्यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती रुजली आणि वाढली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे हे अभियान आता खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “या चळवळीमुळे एकेकाळी उघडी आणि बोडकी असणारी अनेक डोंगर आता हिरवीगार दिसू लागली असून तालुक्यात सर्वत्र हिरवाई निर्माण झाली आहे.”
यावर्षीचा आनंद मेळावा उद्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सायखिंडी येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह रणजितसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, विष्णुपंत रहाटळ, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिलीताई तांबे, प्रमिला अभंग, अर्चनाताई बालोडे, बी. आर. चकोर, प्रा. बाबा खरात, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, हौशीराम सोनवणे, मोहनराव करंजकर, विलास वर्पे, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, आनंद वर्पे, निखिल पापडेजा, हैदर आली, जावेद शेख, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक दशरथ वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी.बी. बाचकर आणि अमृत उद्योग समूहाचे अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत.
दंडकारण्य अभियान समिती आणि अमृत उद्योग समूहाच्या वतीने संगमनेरमधील सर्व पर्यावरण प्रेमी, नागरिक बंधू-भगिनी, महिला आणि युवकांनी या आनंद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दंडकारण्य अभियानाचा २० वा ‘आनंद मेळावा’ उद्या सायखिंडीत! थोरात, डॉ. तांबेंसह मान्यवरांची उपस्थिती
या चळवळीमुळे एकेकाळी उघडी आणि बोडकी असणारी अनेक डोंगर आता हिरवीगार दिसू लागली असून तालुक्यात सर्वत्र हिरवाई निर्माण झाली आहे.