Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘शहर घडवले, आता नावारूपाला आणणार’; आमदार तांबे यांनी दिला विकासकामांसाठी निधीचा ठाम विश्वास!
निवडणूक

‘शहर घडवले, आता नावारूपाला आणणार’; आमदार तांबे यांनी दिला विकासकामांसाठी निधीचा ठाम विश्वास!

गेल्या एका वर्षापासून शहर व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे, शांतता व व्यवस्था बिघडली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले. हीच विकासाची परंपरा आपण कायम ठेवणार असून, शहराच्या विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वास संगमनेरवासियांना देत थोरात यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान मोठे आहे. त्यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध असून, मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेल्यास ते सर्वप्रथम थोरात साहेबांची चौकशी करतात आणि त्यांचा आदर करतात. थोरात साहेबांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
मालदाड रोड, अलकानगर, गणेश नगर आणि मोमीनपुरा येथे झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सेवा समितीचे उमेदवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, संगमनेर सेवा समिती राजकारणविरहित काम करत असून, या समितीमार्फत यंदा २० नवीन आणि ११ जुन्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. पंचायत समितीजवळ साडेसात कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनल उभारले जात आहे, जे पूर्ण झाल्यावर शहरातील सर्व ट्रक पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येईल. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) कमी करण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे पाईपलाईनद्वारे शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवले. शिक्षणाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो विद्यार्थी संगमनेरमध्ये येत आहेत. मात्र, गेल्या एका वर्षापासून संगमनेरची परिस्थिती बदलली आहे. शहरात अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी आणि गुंडगिरी वाढली आहे. मागील आठवड्यात एका मुलाचा हात तोडण्याची घटना घडली, पोलीस स्टेशनमध्येही मारामारी होत आहेत. यामुळे संगमनेरची प्रतिमा मलिन होत असून, हे सर्व थांबवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.
थोरात साहेबांचा सर्व पक्षांमध्ये आदर करणारे कार्यकर्ते असल्याने, मी कोणत्याही मंत्र्याकडे कामासाठी गेलो तर ते कधीही शब्द पडू देत नाहीत. शहराच्या विकासासाठी यापुढेही निधी कमी पडणार नाही. शहरातील गरीब लोकांना ५०० स्क्वेअर फूटची पक्की घरे देण्याचा मानस असून, त्यासाठी निधी आणण्यासाठी पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि चांगले संबंध आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला संगमनेर शहरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शांतता आणि व्यवस्थेचा प्रश्न – 
संगमनेर शहराची वाटचाल नेहमीच चांगली राहिली आहे. येथे बंधुभावाचे वातावरण असून, विकासाच्या योजना राबवताना कधीही भेदभाव केला नाही. मात्र, गेल्या एका वर्षापासून शहर व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे, शांतता व व्यवस्था बिघडली आहे. अवैध धंदे आणि ड्रग्जसारखे अमली पदार्थ संगमनेर शहरात कसे येत आहेत आणि यामागे कोण आहे, याचा विचार जनतेने करायला हवा. संगमनेरमध्ये यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. हे सर्व रोखण्याची जबाबदारी आपली आहे. राजकारणातील मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 778
बाळासाहेब थोरात संगमनेर नगरपरिषद निवडणूक संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.