Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर रेल्वे मार्गासाठी स्टंटबाजी नको, जनतेच्या आवाजासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा: रेल्वे कृती समितीची मागणी
राजकारण

संगमनेर रेल्वे मार्गासाठी स्टंटबाजी नको, जनतेच्या आवाजासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा: रेल्वे कृती समितीची मागणी

संगमनेरचे लोकप्रतिनिधी काम न करता स्टंटबाजी आणि विकास न करता फ्लेक्सबाजी करतात, अशी टीका समितीने केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे महत्त्व ओळखून, संगमनेर रेल्वे कृती समितीने येथील लोकप्रतिनिधींना केवळ छायाचित्रांसाठी स्टंटबाजी न करता, नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. समितीने शहरातील नवीन लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला असून, मागील एका वर्षात शहरात अमली पदार्थ आले पण विकासाची रेल्वे पळाली, असा थेट आरोप केला आहे.

शिर्डीमार्गे वळवलेल्या रेल्वेला विरोध करा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, मात्र विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली आहे. हा निर्णय संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांच्या नोकरी-व्यवसायासाठी अत्यंत नुकसानदायक ठरणारा आहे.

रेल्वे कृती समितीच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर रेल्वे मार्गाचे होर्डिंग्ज उभारून नागरिकांना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगमनेरच्या दळणवळण आणि व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शिर्डी मार्गे वळवली. याला संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी केवळ विरोधच नाही, तर प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दाखवली पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आमदार तांबेंच्या जनचळवळीत सामील व्हा- आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी मोठी लोक चळवळ उभी केली आहे. यात ऑनलाइन कॅम्पियन आणि सह्यांची मोहीम संगमनेरमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर येथील सर्वपक्षीय नागरिक आणि लोकप्रतिनिधी सहभागी आहेत.

समितीने संगमनेरच्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य करताना म्हटले आहे की, नागपूर अधिवेशनामध्ये हातात फलक घेऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांनी आमदार तांबे यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा. फक्त फोटोसाठी फ्लेक्सबाजी न करता, मुख्यमंत्र्यांसमोर आवाज उठवा, उपोषणाला बसा किंवा राजीनामा द्या; पण ठोस कृती करा.

संगमनेरचे लोकप्रतिनिधी काम न करता स्टंटबाजी आणि विकास न करता फ्लेक्सबाजी करतात, अशी टीका समितीने केली आहे.

अमली पदार्थांचे आगमन, रेल्वेचे पलायन- युवक कार्यकर्ते प्रवीण गुंजाळ, प्रवीण पानसरे आणि सचिन दिघे यांनी तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, मागील एक वर्षात संगमनेर शहर आणि तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. ‘ड्रग्स, एमडी, मेडिसिन आणि अवैध धंदे वाढले. एका वर्षात अमली पदार्थ शहरात आले, मात्र विकासाची रेल्वे बाहेर गेली.’ या गंभीर परिस्थितीला कोण जबाबदार आहे, याचे उत्तर नवीन लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 810
अमोल खताळ नाशिक पुणे रेल्वे नाशिक पुणे रेल्वे कृती समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.