Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये इंदिरानगरच्या ४० वर्षांच्या संघर्षाला यश! महसूल मंत्र्यांकडून ३ दिवसांत मालकी हक्काचे हस्तांतरण सुरु करण्याचे आमदार तांबेना आश्वासन, दिरंगाईसाठी सब रजिस्ट्रारची बदली करणार
राजकारण

संगमनेरमध्ये इंदिरानगरच्या ४० वर्षांच्या संघर्षाला यश! महसूल मंत्र्यांकडून ३ दिवसांत मालकी हक्काचे हस्तांतरण सुरु करण्याचे आमदार तांबेना आश्वासन, दिरंगाईसाठी सब रजिस्ट्रारची बदली करणार

पुढील 3 दिवसात या जागांचे मालकी हक्क रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. असे महसूलमंत्र्यांनी आमदार तांबे यांना आश्वस्त केले आहे. याबद्दल तांबे यांनी महसूलमंत्र्यांना धन्यवाद दिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर/नागपूर – 
संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली.
या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने इंदिरानगरमधील सर्व रहिवाशांचे जमिनीचे उतारे (टायटल) एका दिवसात क्लिअर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित, दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई – दरम्यान यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याचा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या दिरंगाईची दखल घेत आमदार तांबे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आणि विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
महसूल मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन – यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सब रजिस्ट्रार यांची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कोणाच्या दबावाखाली हा हलगर्जीपणा झाला, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
३ दिवसांत मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया – सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुढील ३ दिवसांत या जागांचे मालकी हक्क स्थानिक रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने इंदिरानगरच्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार तांबे यांनी या संपूर्ण पाठपुराव्याबद्दल महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी केलेला पाठपुरावा…
📌 11 जुलै 2025 – या प्रकरणासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.
📌 14 जुलै 2025 – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणाचं गांभीर्य मांडलं.
📌 30 जुलै 2025 – माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, संगमनेरचे तहसीलदार आणि इतर महसूल अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रत्यक्ष कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याचा निर्णय. 
📌 1 ऑगस्ट 2025 – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा पत्र लिहून सर्व नं. 106(442) प्रमाणे सर्वे नं. 104, 105, 219 येथील कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याची विनंती.
📌 5 ऑगस्ट 2025 – पुन्हा महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. मात्र, माननीय मंत्री महोदयांनी आदेश देऊनही अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याबाबत आज तांबे यांनी थेट हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तातडीने सदर जमिनीचे मालकी हक्क स्थानिक रहिवाशांच्या नावे कन्फरमेशन डिड करून हस्तांतरित करावे अशी मागणी केली होती. 

  • तांबे यांच्या मागणीच्या उत्तरात महसूल मंत्री म्हणाले… महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सब रजिट्रार यांची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणाच्या दबावात असा हलगर्जीपणा करण्यात आला याचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, पुढील 3 दिवसात या जागांचे मालकी हक्क रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. असे महसूलमंत्र्यांनी आमदार तांबे यांना आश्वस्त केले आहे. याबद्दल तांबे यांनी महसूलमंत्र्यांना धन्यवाद दिले आहे. 
  • नेमकं काय करणार… जवळपास ७०० नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित असल्याने आणि एकाच दिवशी एवढी मोठी कामे कार्यालयाच्या मनुष्यबळासाठी शक्य नसल्यामुळे, महसूल मंत्र्यांनी विशेष उपाययोजना जाहीर केली. ७०० दस्तनोंदणीचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा विशेष कॅम्प लावण्यात येणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाईल, जेणेकरून सर्व नागरिकांचे काम जलद गतीने पूर्ण होईल. आयजीआर स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संगमनेरला उपस्थित राहतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,221
इंदिरानगर चंद्रशेखर बावनकुळे मालकी हक्क सत्यजित तांबे हिवाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.