Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या आरोग्य सेवेला गती: आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय
आरोग्य

संगमनेरच्या आरोग्य सेवेला गती: आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

आरोग्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संगमनेरच्या आरोग्य सुविधा बळकटीकरणाला आणि प्रलंबित प्रकल्पांना लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2025Updated:11/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागपूर
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना तातडीने चालना देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीनुसार, १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय, घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम आणि कामगार रुग्णालय उभारणीच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेरच्या आरोग्य सुविधांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी बैठकीसाठी राज्याचे आरोग्यसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा डॉ. संजय घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय: संगमनेर नगरपरिषद हद्दीतील कॉटेज हॉस्पिटल येथे १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री व नवजात बालके रुग्णालय उभारण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास सांगितले आहे.
घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालय बांधकाम: घुलेवाडी येथील सुरू असलेल्या नव्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामाच्या संथ गतीची नोंद घेण्यात आली. हे बांधकाम लवकरात लवकर आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
कामगार रुग्णालय सुरू करणार: कामगार आणि निम्न उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी संगमनेरला ‘कामगार रुग्णालय’ सुरू करण्यावर चर्चा झाली. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आणि निधी उपलब्धतेवर तातडीने पावले उचलण्यात येतील.
इतर महत्त्वाचे निर्णय व सुधारणा: या बैठकीत ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ संदर्भातही चर्चा झाली. या नियमांमुळे खासगी रुग्णालयांना अडचण निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्यांवरही चर्चा होणार आहे. या प्रश्नाचे स्वरूप नगर विकास खात्याशी संबंधित असल्याने उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, संगमनेर तालुक्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, आपत्कालीन सेवा आणि जिल्हा स्तरावरील समन्वय या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून तातडीने उपयोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. आरोग्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संगमनेरच्या आरोग्य सुविधा बळकटीकरणाला आणि प्रलंबित प्रकल्पांना लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.


⏩ “आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली असून लवकरच ठोस निर्णय व पावले उचलली जातील. त्यांच्या माध्यमातून संगमनेरच्या आरोग्य सेवेचा स्तर अधिक उंचावण्यासाठी हे प्रयत्न अविरत सुरू राहतील.” – आमदार अमोल खताळ.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 783
अमोल खताळ आरोग्य प्रकाश आबिटकर बैठक राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.