Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये १ जानेवारीपासून सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार! भव्य आयोजन, मोठे बक्षिसे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह २६ वे पर्व
क्रिडा व कला

संगमनेरमध्ये १ जानेवारीपासून सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार! भव्य आयोजन, मोठे बक्षिसे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह २६ वे पर्व

स्पर्धा १ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेची अधिक माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे २६ वे पर्व लवकरच सुरू होत आहे.

माजी आमदार डॉ. तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा १ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेची अधिक माहिती दिली.

राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ३ लाख रुपये तर द्वितीय बक्षीस २ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर तृतीय, चतुर्थ आणि वैयक्तिक बक्षिसांचाही समावेश आहे. या स्पर्धेत आयपीएल आणि राज्य पातळीवर खेळणाऱ्या विविध खेळाडूंचा सहभाग राहणार आहे.

या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन करण्यात येत असून, अद्ययावत ग्राउंड, टर्फ विकेट, लश ग्रीन ग्राउंड, युट्युबवर लाईव्ह प्रक्षेपण, क्रिक हिरोज व लाइव्ह स्कोअर अशा सुविधा उपलब्ध असतील. तसेच, प्रत्येक संघाला ड्रेस कोड, शंभर किलोमीटर बाहेरून येणाऱ्या संघाची राहण्याची, जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था या अद्ययावत सुविधा राहणार आहेत. एमसीएचे मान्यता प्राप्त पंच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ३२ संघांना प्रवेश असलेली ही स्पर्धा नॉक आउट पद्धतीने खेळवली जाणार आहे.

गुरुवारी (१ जानेवारी २०२६) सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला लोकनेते बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. मागील वर्षी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी भारताचे माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर यावर्षी सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते व क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत सहभागाकरता क्रिकेट संघांनी आपली नावे अंबादास आडेप (९८८१०१३३२०), संदीप लोहे (९९७०३७१७७७), आसिफ तांबोळी (९८२२५०००८२८), गिरीश गोरे (७०२०१८५१३१) यांच्याकडे नोंदवावीत.

जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांनी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक, महिला, युवक आणि सर्व क्रिकेटप्रेमींनी या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 650
क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर जयहिंद लोक चळवळ बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.