Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, जिल्हा व सत्र न्यायालयाने केली तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता; खटल्याकडे संगमनेरकरांचे लागले होते लक्ष!
न्यायालय

शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, जिल्हा व सत्र न्यायालयाने केली तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता; खटल्याकडे संगमनेरकरांचे लागले होते लक्ष!

आरोपींच्यावतीने ॲड. बाळासाहेब एस. शिंदे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. अश्विनी पी. खरात यांनी सहकार्य केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटलाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते.

मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहे.

०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

फिर्यादीनुसार, सदर आरोपी घटनेच्या वेळी वाळूची अवैध वाहतूक करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जात होते. नदीपात्रातून कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर तलाठी पोमल तोरणे व नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी पाठलाग करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख आणि लतीफ हसन शेख या तिघांनी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला यादरम्यान तलाठी तोरणे यांनी त्यांची मोटरसायकल बाजूला केल्याने त्यांचे प्राण वाचले. आरोपींनी नायब तहसीलदार जाधव आणि तलाठी तोरणे यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

मारहाणीमध्ये आरोपींनी नायब तहसीलदार जाधव यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, तलाठी तोरणे यांच्या उजव्या हाताला बोटाला, कोपराला, डाव्या बरगडीत, पोटात व पाठीत मारहाण करण्यात आली, तर नायब तहसीलदार जाधव यांच्या छातीत मुका मार लागला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. या प्रकरणाच्या अनुषंगाने सरकार पक्षातर्फे फिर्यादी तलाठी पोमल तोरणे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, डॉ. भास्कर भवर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व इतर साक्षीदारांसह एकूण ८ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश नेरलेकर यांच्यासमोर आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा शाबित न झाल्यामुळे, त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपींच्यावतीने ॲड. बाळासाहेब एस. शिंदे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. अश्विनी पी. खरात यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,607
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.