नागपूर:
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे नियोजन सिन्नर-संगमनेर-जुन्नर मार्गेच करावे, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीचे पर्यटन महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे तांबे यांनी सभागृहात सांगितले.
विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना आमदार तांबे यांनी महाराजांच्या जन्मभूमीचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे आणि त्यांचे जन्मस्थळ जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आहे, असे तांबे म्हणाले.
सध्या नियोजित असलेला नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड मार्गे पुण्याला जोडला जाणार आहे. या नैसर्गिक मार्गामुळे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, तसेच ओझर आणि लेण्याद्री येथील धार्मिक स्थळेही रेल्वेच्या जाळ्याशी जोडली जाणार आहेत. यामुळे राज्यभरातील शिवभक्तांना आणि नागरिकांना महाराजांचा प्रेरणादायी इतिहास पाहण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे, याकडे तांबे यांनी लक्ष वेधले.
मार्ग बदलल्याने जनआंदोलनाचा इशारा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून सुरुवातीला नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच नियोजित झाली होती. मात्र, सत्तांतरानंतर हा मार्ग पुणे-पुणतांबा असा उलटा प्रस्तावित करण्यात आला. संगमनेर मार्गाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत आणि हा मार्ग व्यापार, शिक्षण, आणि उद्योग व्यवसायासाठी अत्यंत सोयीचा व नैसर्गिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नवीन प्रस्तावित अहिल्यानगर-शिर्डी मार्गाला तीव्र विरोध दर्शवत, मूळ संगमनेर मार्गासाठी सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, अकोले, खेड, मंचरमधील नागरिक आक्रमक झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे कृती समितीने दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांकडून आमदार तांबे यांच्या मागणीचे मोठ्या उत्साहाने अभिनंदन होत आहे.
नाशिक-पुणे रेल्वेसाठी राजकीय वादंग: ‘शिवनेरी’ जोडणाऱ्या संगमनेर मार्गावर आमदार तांबे आग्रही; जनआंदोलनाचा इशारा
नाशिक-पुणे रेल्वे 'संगमनेर' मार्गे झाल्यास शिवनेरी, ओझर-लेण्याद्रीचा पर्यटन विकास



नागपूर: 
सध्या नियोजित असलेला नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड मार्गे पुण्याला जोडला जाणार आहे.
नवीन प्रस्तावित अहिल्यानगर-शिर्डी मार्गाला तीव्र विरोध दर्शवत,