Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासनाकडून ‘उधळपट्टी’ झाल्याचा गंभीर आरोप : 316 कोटींचा चुराडा! रेल्वे मार्ग शिर्डीकडे का वळवला? संगमनेर रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक
सामाजिक

शासनाकडून ‘उधळपट्टी’ झाल्याचा गंभीर आरोप : 316 कोटींचा चुराडा! रेल्वे मार्ग शिर्डीकडे का वळवला? संगमनेर रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा रेल्वे मार्ग संगमनेरमार्गेच झाला पाहिजे यासाठी तांबे यांनी केवळ अधिवेशनातच नव्हे, तर रस्त्यावर उतरूनही जनआंदोलन छेडले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/12/2025Updated:13/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नागपूर – 

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा आता विकोपाला गेला असून, हा प्रस्तावित मार्ग संगमनेरवरून अचानक शिर्डी मार्गे वळवल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता आणि ‘महारेल’ विभागाने सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण या मार्गासाठी सर्वेक्षणही पूर्ण केले. तांबे यांनी सभागृहात सांगितले की, या मार्गासाठी राज्य शासनाने 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले असून त्यावर 316 कोटी रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे कोणत्या उद्देशाने वळवला गेला, असा थेट सवाल आमदार तांबे यांनी उपस्थित केला.

आमदार तांबे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना सांगितले की, नाशिक, पुणे आणि मुंबई या सुवर्ण त्रिकोणामध्ये येणारा संगमनेर मार्ग भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा होताच, पण या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, तसेच अष्टविनायकांमधील ओझर आणि लेण्याद्री ही तीर्थस्थळे थेट जोडली जाणार होती. मात्र, आता हा मार्ग बदलल्यामुळे हे सर्व लाभ हिरावून घेतले गेले आहेत.

याशिवाय, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आणि उताऱ्यावर रेल्वेचे नाव लागले, त्यांचे पैसे आता परत कोण देणार? असा संतप्त प्रश्न विचारून, 316 कोटी रुपयांची शासकीय उधळपट्टी केल्यानंतर मार्ग बदलण्याची गरज काय होती, असा थेट आरोप तांबे यांनी राज्य सरकारवर केला.

या प्रश्नावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तरात, राज्य सरकार या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. परंतु, या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदार सत्यजित तांबे सभागृहात चांगलेच आक्रमक झाले.

🌟 लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा रेल्वे मार्ग संगमनेरमार्गेच झाला पाहिजे यासाठी तांबे यांनी केवळ अधिवेशनातच नव्हे, तर रस्त्यावर उतरूनही जनआंदोलन छेडले आहे. त्यांनी सर्वपक्षीय नागरिकांची बैठक घेतली असून, लवकरच या मार्गावरील लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेणार आहेत. सोशल मीडिया कॅम्पेन, सह्यांची मोहीम आणि ऑनलाईन ई-मेलच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र झाले आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी संगमनेर मार्गे रेल्वेसाठी पाठिंबा द्यावा, असे कळकळीचे आवाहन रेल्वे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 603
नाशिक पुणे रेल्वे मार्ग सत्यजित तांबे हिवाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.