Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे रेल्वे ‘सरळ’ मार्गेच व्हावी; संगमनेरमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले, जनआंदोलनाचा एल्गार!
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वे ‘सरळ’ मार्गेच व्हावी; संगमनेरमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले, जनआंदोलनाचा एल्गार!

संवादाने प्रश्न मिटेल अशी आशा यावेळी सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/12/2025Updated:22/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-अकोले-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मूळ आराखड्यानुसारच झाला पाहिजे, या मागणीसाठी आता जनआंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज नांदूर खंदरमाळ फाटा (संगमनेर) येथे या मार्गावरील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक सोमवारी पार पडली. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गानेच सरळ रेषेत जावी यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्या या मागणीसाठी नुकताच अकोले-संगमनेर भव्य मोर्चा काढला होता. 22 किलोमीटरचे अंतर पार करत संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये संबंधित सर्व आमदार खासदारांनी एकत्र बैठक करून या आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन अकोलेकरांनी केले होते. आमदार सत्यजित तांबे यांनी या आवाहनानुसार पुढाकार घेतला.

नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतूक व्यवस्था मिळण्यासाठी आणि विद्यार्थी व नोकरदारांच्या हितासाठी हा रेल्वे मार्ग पूर्वीच्याच सरळ मार्गाने होणे अत्यंत गरजेचे असल्याचा सूर या बैठकीत उमटला. संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करून आपली मागणी मान्य करून घेण्यावर यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे एकमत झाले.

या प्रकल्पासाठी आतापर्यंत शासनाने जवळपास १००० कोटी रुपये खर्च केले असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण देखील पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत आता इथून माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा, अशी ठाम भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. नाशिक-शिर्डी आणि अहिल्यानगर-पुणे या रेल्वे मार्गांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र नाशिक-पुणे रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करणे आम्हाला मान्य नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडणार आहे. आजच्या बैठकीतूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यात आली असून, त्यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे, महेश नवले, गणेश ताजने, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, जालिंदर वाकचौरे, अमोल वाघमारे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ यांसह विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे यांनी स्वागत केले.

🌟 🌟 संवादाने प्रश्न मिटेल अशी आशा यावेळी सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या सर्व परिसरामध्ये व्यापक जनजागृती करून भव्य लढा उभारण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सिन्नर ते राजगुरुनगर असा भव्य व्हेईकल मार्च काढून आंदोलनाची तयारी करण्याबाबत यावेळी प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने जनभावना लक्षात न घेतल्यास चाकण किंवा आळेफाटा या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन करून हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,121
अजित नवले नाशिक पुणे रेल्वे नाशिक पुणे रेल्वे कृती समिती सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.