Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; पिकअपसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

वाळू तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; पिकअपसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी ही वाळू जोर्वे गावातील प्रवरा नदीच्या पात्रातून चोरून आणल्याची कबुली चालकाने दिली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा झेनॉन पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आश्वी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक संशयास्पद टाटा कंपनीची पिकअप गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता ऋषिकेश कारभारी वर्षे (वय २८, रा. कनोली, ता. संगमनेर) याच्या ताब्यात असलेल्या या गाडीच्या हौद्यात अवैध वाळू साठा आढळून आला. 

चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी ही वाळू जोर्वे गावातील प्रवरा नदीच्या पात्रातून चोरून आणल्याची कबुली चालकाने दिली.

या कारवाईनंतर पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर २९८/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात आणि चालक भगवान धुले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 991
अहिल्यानगर एलसीबी वाळू चोरी वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी…

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.