Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मिरवणुकीचा गुलाल साफ करणे पडले महागात; नगरसेविकेसह समर्थकांची मुजोरी, महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, ७ जणांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद
गुन्हेगारी

मिरवणुकीचा गुलाल साफ करणे पडले महागात; नगरसेविकेसह समर्थकांची मुजोरी, महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, ७ जणांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद

आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 23, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमध्ये सोमवारी रात्री एका नगरसेवकासह १७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा नवनिर्वाचित नगरसेवकाकडून अशाच घटनेची पुनरावृत्ती आज (मंगळवारी) पुन्हा झाल्याचा नवीन प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे.

मिरवणुकीतील गुलाल धुऊन काढण्यासाठी व कचरा काढण्यासाठी फिर्यादीने नगरपालिकेचे वाहन बोलावले या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिला आणि साक्षीदारांना नवनिर्वाचित नगरसेविकेसह काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सात आरोपींसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशोदा राजेंद्र अभंग (वय ४०, रा. इंदिरानगर गल्ली नं. ९) यांच्या घरासमोर मिरवणुकीचा गुलाल आणि कचरा साचला होता. हा कचरा साफ करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेचे वाहन बोलावले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी “तुम्ही वाहन कशासाठी बोलावले?” असा जाब विचारत वाद घातला.

आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे आणि खिडकीचे नुकसान केले. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी महिला स्वतः जखमी झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ११०२/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५(२), १८९(२)(५), ३२४(१), ३५२, ३५१(२) नुसार संजय मुरलीधर गाडे, वनिता संजय गाडे, शिवराज संजय गाडे, हरिष दिलीप थोरात, ओमकार थोरात, वैष्णव मुर्तडक, सागर कानकाटे या प्रमुख आरोपींसह इतर अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 7,506
गुन्हेगारी नवनिर्वाचित नगरसेवक संगमनेर शहर पोलीस हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.