Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा राडा: आता कायद्याचा बडगा! नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मुजोरीवर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’
गुन्हेगारी

संगमनेरचा राडा: आता कायद्याचा बडगा! नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मुजोरीवर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

विशेष म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे, त्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीच कायदा हातात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर 

राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक गोंधळात सापडले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे.

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून संगमनेरने अनेक बाबतीत विकासाची मोठी भरारी घेतली आहे. एकीकडे शांत आणि संयमी असे थोरात-तांबे यांचे नेतृत्व राज्यभरात ओळखले जाते. या अनुषंगाने संगमनेरने शांत आणि सुसंस्कृत शहराचे स्वतंत्र असे अस्तित्व राज्याच्या पटलावर निर्माण केले आहे.

नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी विजयी उमेदवार, समर्थकांकडून शहराच्या विविध भागात जोरदार राडा झाला. आनंदाच्या मिरवणुकांचे रूपांतर थेट हिंसक संघर्षात झाले. विशेष म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे, त्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीच कायदा हातात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यांच्या घटनांनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी तातडीने दोन गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा कडक इशारा- शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आता ‘फुल ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याचे रूपांतर हिंसेत होणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. मग तो लोकप्रतिनिधी असो वा सामान्य कार्यकर्ता; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आम्ही कोणाचीही भीडभाड धरणार नाही, सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन- वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. जे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक बारवकर नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ….

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/12/VID-20251223-WA0106.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,255
संगमनेर शहर पोलीस समीर बारवकर हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी…

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.