Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग सज्ज; पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते १४ रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
सामाजिक

बिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग सज्ज; पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते १४ रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज-

जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४ रेस्क्यू वाहनांना मंजुरी दिली होती. या वाहनांचा पुरवठा आता सुरू झाला असून, निळवंडे येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात अकोले येथील वनक्षेत्रपाल यांना ‘बोलेरो कॅम्पर’ वाहनाची चावी सुपूर्द करून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली.

या आधुनिक वाहनांमुळे क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना बिबट-मानव संघर्षाच्या घटना घडल्यास अत्यंत दुर्गम भागातही तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे मदत कार्यातील विलंब टळणार असून वन्य प्राण्यांना जेरबंद करणे किंवा नागरिकांचे संरक्षण करणे अधिक सुलभ होणार आहे. वनविभागाच्या या सज्जतेमुळे जिल्ह्यातील संवेदनशील भागांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.

या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार अमोल खताळ पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जलसंपदा व वनविभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
राधाकृष्ण विखे रेस्क्यू वाहने लोकार्पण वनविभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत…

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.