Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात ५१ कोटींच्या विकासकामांचा झंझावात; पालकमंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शनिवारी गावोगावी शुभारंभ सोहळा!
राजकारण

संगमनेर तालुक्यात ५१ कोटींच्या विकासकामांचा झंझावात; पालकमंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शनिवारी गावोगावी शुभारंभ सोहळा!

दिवसभर चालणाऱ्या या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याची सांगता सायंकाळी पिंपरणे येथे एका जाहीर सभेने होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, घुलेवाडी, खांजापूर, कुरण आणि तळेगाव अशा दहा लोखंडी पुलांचे ४ कोटी ५८ लाख रुपये खर्चाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तालुक्यातील दळणवळण सुलभ व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मालदाड येथील १७ कोटी २९ लाख रुपयांची कामे, पिंपळनेर ते कोळवाडी रस्त्याचे १० कोटी ६४ लाख रुपयांचे काम, आणि मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या नव्याने मंजूर झालेल्या ६ कोटी ५९ लाख रुपयांच्या रस्त्याचा समावेश आहे. याशिवाय वडगाव लांडगा येथे ५ कोटी २१ लाख, हिवरगाव पावसा येथे ५ कोटी ८ लाख आणि चंदनापुरी येथे ३ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहे.

केवळ भौतिक विकासच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी धांदरफळ येथील कार्यक्रमात थेट लाभ हस्तांतरण केले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३३ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व अवजारांसाठी ३५ लाख २५ हजार रुपये, तर एमआयडीएच अंतर्गत हरितगृह व शेडनेट उभारणीसाठी १४ लाभार्थ्यांना १ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८ लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल.

पिंपरणे येथे होणार भव्य जाहीर सभा- दिवसभर चालणाऱ्या या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याची सांगता सायंकाळी पिंपरणे येथे एका जाहीर सभेने होणार आहे. या सभेच्या माध्यमातून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ तालुक्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना संगमनेर तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 642
अमोल खताळ निधी भूमिपूजन राधाकृष्ण विखे लोकार्पण विकास कामे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.