Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमची चूक झाली, म्हणूनच कोल्ह्या-कुत्र्यांच्या हातात सत्ता गेली; शरद नाना थोरातांचा विरोधकांवर कडाडून हल्ला
राजकारण

आमची चूक झाली, म्हणूनच कोल्ह्या-कुत्र्यांच्या हातात सत्ता गेली; शरद नाना थोरातांचा विरोधकांवर कडाडून हल्ला

तालुक्यात जो काही निकाल लागला, तो कोणाच्या कर्तृत्वामुळे नाही, तर आपल्यातील गट-तटांमुळे लागला आहे. आता आपल्याला हे गट-तट बाजूला ठेवावे लागतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2026Updated:05/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

आमच्या काही चुका झाल्या, हे मी जाहीरपणे कबूल करतो. आणि आमच्या याच चुकांमुळे आज तालुक्यातील सत्ता कोल्ह्या-कुत्र्यांच्या’ हातात गेली आहे. पण लक्षात ठेवा, हा शरद नाना एकटा नाही, तर माझ्यासोबत असंख्य वाघ उभे आहेत. जर आमच्या नादी लागाल, तर तालुक्यात फिरणं मुश्किल होईल, अशा शब्दांत शरद नाना थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार समारंभवेळी झालेल्या जाहीर सभेत जिल्हा परिषदेच्या जोर्वे गटाची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे शरद नाना थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, काँग्रेसच्या युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात शरद नानांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की, आज काही लोक धर्माच्या नावाखाली आपल्या ग्रामीण भागातील तरुणांचे माथे भडकवण्याचे काम करत आहेत. आम्ही काय हिंदू नाही का? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. पण धर्माच्या नावावर राजकारण करून जे माथे भडकवत आहेत, त्यांना मातीत गाडण्याची सुरुवात आता पिंपरणे नगरीतूनच होईल.

आमदार अमोल खताळ यांचं थेट नाव घेण्याचे टाळत केवळ ‘कालचं पोरगं’ असा उल्लेख करत नानांनी त्यांना थेट इशारा दिला. भाऊ, तू कोणाचेही बोट धरून चाल, आम्हाला देणंघेणं नाही. पण संगमनेर तालुका हे आमचं एक कुटुंब आहे. जर तू आमच्या कुटुंबाच्या आणि भावाच्या (बाळासाहेब थोरात) नादी लागला, तर तुला तालुक्यात फिरणं कठीण होईल. हे माझं चॅलेंज समज, असे खडेबोल त्यांनी सुनावले.

गेल्या वर्षी शिवजयंती उत्सवात राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शरद नानांनी संताप व्यक्त केला. शिवजयंती हा संपूर्ण समाजाचा उत्सव आहे, त्यात पक्षाचा बिबा कालवण्याचे काम विरोधकांनी केले. मी तेव्हाही स्टेजवर जाण्यास नकार दिला होता कारण महाराजांच्या उत्सवात राजकारण मला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे तुम्हाला वाचवायला नाना नसेल, असे देखील विरोधकांना सुनावले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना शरद नाना म्हणाले की, तालुक्यात जो काही निकाल लागला, तो कोणाच्या कर्तृत्वामुळे नाही, तर आपल्यातील गट-तटांमुळे लागला आहे. आता आपल्याला हे गट-तट बाजूला ठेवावे लागतील. बाळासाहेब थोरात ज्याला उमेदवारी देतील, त्याच्या पाठीशी मी ढाल आणि तलवार बनून उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तब्बल अडीच ते तीन तास सुरू असलेल्या या सभेला पिंपरणे पंचक्रोशीतील हजारो नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद नानांच्या या रोखठोक भाषणामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,564
बाळासाहेब थोरात शरद नाना थोरात शेतकरी मेळावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.