Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नूतन नगराध्यक्षांच्या अभिनंदनाचे निमित्त, की आगामी निवडणुकांची रणनीती? विश्रामगृह ते तांबे निवासस्थान: राम शिंदेंचा २० मिनिटांचा तो ‘राजकीय’ प्रवास!
राजकारण

नूतन नगराध्यक्षांच्या अभिनंदनाचे निमित्त, की आगामी निवडणुकांची रणनीती? विश्रामगृह ते तांबे निवासस्थान: राम शिंदेंचा २० मिनिटांचा तो ‘राजकीय’ प्रवास!

संगमनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या नूतन नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना देखील शुभेच्छा दिल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

पुण्याहून कोपरगावकडे जात असताना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सोमवारी संगमनेर येथे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः आमदार सत्यजीत तांबे यांच्या राजकीय प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या एका बड्या नेत्याने तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन केलेली ही अनौपचारिक चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रा. राम शिंदे संगमनेर येथे पोहोचले. त्यांनी सुरुवातीला शासकीय विश्रामगृहावर विश्रांती घेऊन भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर महायुतीचे (शिवसेना) आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांनी थेट इंदिरानगर येथील डॉ. सुधीर तांबे यांचे निवासस्थान गाठले.

यावेळी त्यांच्यासोबत जालिंदर वाकचौरे उपस्थित होते. सुमारे २० ते २५ मिनिटे चाललेल्या या भेटीत शिंदे यांनी तांबे कुटुंबियांशी आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. तसेच राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेत संगमनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या नूतन नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना देखील शुभेच्छा दिल्या.

ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी, शिंदे यांच्या दौऱ्याची माहिती भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नव्हती. केवळ मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत आणि गुप्तता पाळत ही भेट पार पडल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोपरगाव येथे भाजपच्या नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम असताना, वाटेत थांबून मुद्दाम तांबे यांच्या घरी जाणे हे भविष्यातील कोणत्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. या भेटीनंतर प्रा. राम शिंदे कोपरगावकडे रवाना झाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,766
भेट मैथिली तांबे राम शिंदे सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.