Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खळबळजनक! संगमनेरच्या गणेश नगरमध्ये भरदिवसा साडेपाच तोळ्यांचे गंठण लंपास; नवीन पोलीस निरीक्षकांच्या काळातही चोऱ्यांचे सत्र सुरूच!
गुन्हेगारी

खळबळजनक! संगमनेरच्या गणेश नगरमध्ये भरदिवसा साडेपाच तोळ्यांचे गंठण लंपास; नवीन पोलीस निरीक्षकांच्या काळातही चोऱ्यांचे सत्र सुरूच!

शहरात सातत्याने घडणाऱ्या चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या घटनांमुळे "संगमनेर सुरक्षित आहे का?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. बस स्थानकावरील पाकीटमारी असो किंवा रस्त्यावरील चैन स्नॅचिंग, गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गणेश नगर भागात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे गंठण ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे.
राजापूर (संगमनेर) येथील रहिवासी नंदा हासे या गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले. त्यांनी संधी साधून नंदा हासे यांच्या गळ्यातील ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून धूम ठोकली. भरवस्तीत आणि भरदिवसा घडलेल्या या ‘धूम स्टाईल’ चोरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेरात महिला असुरक्षित?- शहरात सातत्याने घडणाऱ्या चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या घटनांमुळे “संगमनेर सुरक्षित आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बस स्थानकावर महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण आधीच वाढलेले असताना, आता उपनगरातही महिलांना लक्ष्य केले जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे की काय, अशी भीती सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
पोलीस प्रशासनापुढचे आव्हान- नवे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, चोरट्यांनी सातत्याने कारवाया करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,442
गुन्हेगारी दागिने लंपास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.