Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुमचा पतंग कुणाचा जीव तर घेणार नाही? नायलॉन मांजा टाळा; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे आवाहन
आरोग्य

तुमचा पतंग कुणाचा जीव तर घेणार नाही? नायलॉन मांजा टाळा; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे आवाहन

नगरपालिकेची विशेष पथके आणि पोलीस प्रशासन यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे. शहरात जर कोणीही नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळून आले, तर संबंधितांवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. मैथिली तांबे यांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर (प्रतिनिधी):
मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत असताना, मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अत्यंत घातक ठरणाऱ्या ‘चायनीज’ नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी संगमनेरकरांनी या मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.
चायनीज मांजा हा काच, धातू आणि विविध रासायनिक घटकांपासून बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तर शेकडो निष्पाप पक्षी आपले प्राण गमावतात. हा मांजा निसर्गतः लवकर नष्ट होत नसल्याने तो झाडाझुडपांमध्ये अडकून दीर्घकाळ पर्यावरणाला हानी पोहोचवतो, असे डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.
माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी २०२१ पासूनच नायलॉन मांजाच्या वापरावर कायदेशीर बंदी घातली आहे. शासनाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी संगमनेर शहरात केली जाणार असून, नगरपालिकेची विशेष पथके आणि पोलीस प्रशासन यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे.
शहरात जर कोणीही नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळून आले, तर संबंधितांवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. मैथिली तांबे यांनी दिला आहे. केवळ नफ्यासाठी व्यापाऱ्यांनी असा जीवघेणा मांजा विकू नये आणि नागरिकांनीही तो खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी यंदाची संक्रांत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी. पतंग उडवण्यासाठी केवळ सुती आणि सुरक्षित मांजाचाच वापर करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवताना रत्यावरून ये-जा करणाऱ्या इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची योग्य खबरदारी घ्यावी.
मकर संक्रांतीचा सण हा आनंद आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा असल्याने कोणाच्याही जीविताला धोका न पोहोचवता हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन शेवटी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 446
कारवाई नायलॉन मांजा पतंग मैथिली तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.