Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे रेल्वे मूळ मार्गावरूनच व्हावी! डॉ. अजित नवलेंचे ‘लेटर टू सी. एम.’ मोहिमेचे आवाहन
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वे मूळ मार्गावरूनच व्हावी! डॉ. अजित नवलेंचे ‘लेटर टू सी. एम.’ मोहिमेचे आवाहन

अकोले, संगमनेर, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, पुणे आणि नाशिक या भागातील सर्व खासदार, आमदार आणि राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून विशेष पत्र पाठवावे आणि सरकारवर या मागणीसाठी दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Kochi, Kerala, India -March 2, 2021 a train moving with electric support through the indian railway track
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर / अकोले- 
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरुवातीच्या सर्वेक्षणाप्रमाणे म्हणजेच अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. या भागातील जनभावनेची सरकारने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. ‘नांदूर खांदरमाळ’ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरल्यानुसार, सर्व तालुक्यांमध्ये ‘लेटर टू सी. एम.’ ही व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहणार चळवळ- रेल्वेची ही मागणी तळागाळातील जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही मोहीम अधिक आक्रमक केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून आपल्या भविष्यातील दळणवळणाच्या हक्कासाठी मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर प्रत्येक गावातील नागरिकांनीही स्वतः पत्र लिहून रेल्वे मूळ मार्गानेच नेण्याची आग्रही विनंती सरकारला करावी, जेणेकरून या मागणीचे रूपांतर एका लोकचळवळीत होईल.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे- या लढ्यात केवळ जनताच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे पाठबळही तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. नवले यांनी नमूद केले. अकोले, संगमनेर, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, पुणे आणि नाशिक या भागातील सर्व खासदार, आमदार आणि राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून विशेष पत्र पाठवावे आणि सरकारवर या मागणीसाठी दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोहिमेचा मुख्य उद्देश- नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ आराखडा हा अकोले आणि संगमनेर या भागातून जाणारा होता. मात्र, मधल्या काळात तांत्रिक बदलांच्या नावाखाली या मार्गात बदल करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. हा मार्ग बदलला जाऊ नये आणि स्थानिक शेतकऱ्यांसह प्रवाशांना या रेल्वेचा प्रत्यक्ष फायदा व्हावा, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पुढील काही दिवसांत हजारो पत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून या मागणीकडे लक्ष वेधले जाणार असून, या मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक-अकोले-संगमनेर-पुणे रेल्वे सुरुवातीच्या सर्वेनुसार व्हावी यासाठी नांदूर खांदरमाळ बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांची भेट घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
  • हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून या संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आहे. हजारो पत्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. — डॉ. अजित नवले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 592
अजित नवले जन आंदोलन नाशिक पुणे रेल्वे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.