Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विजयोत्सव संपला, आभार दौरा सुरू! नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे प्रशासकीय फौजफाट्यासह थेट जनतेच्या दारी! आता तक्रारीसाठी पालिकेत जाण्याची गरज नाही; खुद्द नगराध्यक्षाच ‘ऑन द स्पॉट’ निपटारा करण्यासाठी मैदानात!
राजकारण

विजयोत्सव संपला, आभार दौरा सुरू! नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे प्रशासकीय फौजफाट्यासह थेट जनतेच्या दारी! आता तक्रारीसाठी पालिकेत जाण्याची गरज नाही; खुद्द नगराध्यक्षाच ‘ऑन द स्पॉट’ निपटारा करण्यासाठी मैदानात!

एखाद्या तक्रारीसाठी नागरिकांनी कार्यालयात येण्यापेक्षा, स्वतः प्रशासनच नागरिकांच्या दारी गेल्याचे चित्र तांबे यांच्या आभार दौऱ्यातून बघावयास मिळत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026Updated:07/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सहसा विजयोत्सवाचा धुरळा शांत व्हायला अनेक दिवस लागतात, परंतु संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी मात्र एक वेगळाच पायंडा पाडला आहे. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचा पदभार हाती घेतात कामाला सुरुवात केली आहे. तांबे यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाजाला भर न देता आभार दौऱ्याच्या निमित्ताने प्रभागनिहाय भेटी देण्याचे काम सुरू केले आहे. या भेटीदरम्यान ते केवळ नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह प्रभागात फिरत नाही तर मुख्याधिकारी आणि त्यांची सर्व प्रशासकीय टीम त्यांच्यासोबत प्रभागनिहाय दौरे करत आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकाळात शहरात मोठी विकास कामे झाली. शहर स्वच्छतेचे काम या काळात मोठ्या वेगाने पुढे गेले. त्यामुळे पालिकेला कोट्यावधी रुपयांची बक्षीस देखील मिळाली. केंद्रात आणि, राज्यात भाजपाचे सरकार असताना देखील तांब्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या कोट्यावधी रुपयांच्या बक्षिसांचा मोठा बोलवाला झाला.
निवडणुकीदरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी २.० चे व्हिजन संगमनेरकरांसमोर ठेवले आहे. “काम केलंय, आता कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन असल्याचे तांबे दांपत्य आपल्या कृतीतून संगमनेरकरांना दाखवून देत आहे. आमदार तांबे आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी पालिकेत विभागनिहाय भेटी देत कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर आता तांबे यांनी आपल्या कृतीला सुरुवात केली असल्याचे मानले जात आहे.
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नूतन नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी सकाळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेत सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन श्रमदान केले आणि रस्ते चकाचक साफ करून आपल्या कामाची पहिली चुणूक दाखवून दिली. त्यांच्या या कृतीमुळे शहरात स्वच्छतेचा एक सकारात्मक संदेश गेला आहे.
केवळ स्वच्छता करूनच त्या थांबल्या नाहीत, तर आता त्यांनी प्रभागनिहाय आभार दौरे सुरू केले आहे. आज बुधवारी सकाळी त्यांनी प्रभाग क्रमांक १२ चा प्रत्यक्ष दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवक किशोर टोकसे आणि नगरसेविका प्रियंका शहा यांच्यासह डॉ. तांबे यांनी भेट दिली. यावेळी त्यांची कृती केवळ आभार मानणाऱ्या लोकप्रतिनिधीची नव्हती, तर प्रश्नांची तड लावणारा एक प्रशासक म्हणून त्या समोर आल्या. त्यांच्यासोबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि पालिकेची संपूर्ण विभागनिहाय तांत्रिक टीम उपस्थित होती. यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागांना जागेवरच सूचना देण्याचे काम त्यांनी केले.
एखाद्या तक्रारीसाठी नागरिकांनी कार्यालयात येण्यापेक्षा, स्वतः प्रशासनच नागरिकांच्या दारी गेल्याचे चित्र तांबे यांच्या आभार दौऱ्यातून बघावयास मिळत आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी आणि इतर नागरी सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी डॉ. तांबे यांनी बारकाईने समजून घेतल्या आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
एक तरुण, उत्साही आणि उच्चशिक्षित नगराध्यक्षा म्हणून डॉ. मैथिलीताई तांबे यांनी पदाची सूत्रे हाती घेताच जो धडाका लावला आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणुकीच्या जल्लोषातून बाहेर पडून तत्काळ जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या या टीमचा उत्साह पाहून शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशा या कार्यक्षम नगराध्यक्षा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस संगमनेरकरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 975
आभार दौरा दुर्गाताई तांबे प्रशासन मैथिली तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.