Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजहंसच्या शुद्धतेची परंपरा आता बेकरी उत्पादनातही; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ बाजारात; खवय्यांसाठी पर्वणी!
महाराष्ट्र संवाद विशेष

राजहंसच्या शुद्धतेची परंपरा आता बेकरी उत्पादनातही; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ बाजारात; खवय्यांसाठी पर्वणी!

आगामी काळात 'राजहंस चहा' देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास त्याला मोठी मागणी राहील, असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी- 
शुद्धता आणि गुणवत्तेसाठी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाने आता बेकरी उद्योगात आपले पाऊल टाकले आहे. ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ अंतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या विविध दर्जेदार बेकरी पदार्थांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’च्या उद्घाटन सोहळ्यात या नवीन उपपदार्थांचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेरची ओळख आता ‘दुधाचा तालुका’ म्हणून सर्वदूर पोहोचली असून राजहंसने नेहमीच आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जपली आहे. या विश्वासार्हतेमुळेच राजहंसच्या दुधासह इतर उपपदार्थांना राज्यभरातून मोठी मागणी असते. आता नव्याने सुरू केलेले बेकरी पदार्थही ग्राहकांच्या पसंतीस उतरून बाजारपेठेत नक्कीच लोकप्रिय ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ‘राजहंस चहा’ देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास त्याला मोठी मागणी राहील, असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.
राजहंस दूध संघाने आपल्या गुणवत्तापूर्ण दुधाच्या जोडीला आता ग्राहकांसाठी खमंग बेकरी उत्पादने तयार केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मस्का खारी, मिल्क टोस्ट, क्रीम रोल, जीरा बटर, कोकोनट कुकीज, मिल्क कप केक आणि चॉकलेट अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ उच्च दर्जाच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात आले असून ते आता सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. दूध संघाने सातत्याने गुणवत्तेचा आग्रह धरल्यामुळेच इथली उत्पादने श्रेष्ठ ठरली आहेत.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही संगमनेरच्या सहकार मॉडेलचे कौतुक करताना सांगितले की, सहकारातून सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणि आनंद निर्माण करण्याचे काम अमृत उद्योग समूहाने यशस्वीपणे केले आहे.
या सोहळ्याला व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, कैलासराव वाकचौरे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, विक्रम थोरात, संतोष मांडेकर, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि कारखाना कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण- या कार्यक्रमासोबतच आयोजित कृषी प्रदर्शनात राज्यभरातून तब्बल २०० वेगवेगळ्या जातींच्या गाई दाखल झाल्या असून, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि युवकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,002
कळस कृषी प्रदर्शन बाळासाहेब थोरात राजहंस दूध राजहंस बेकरी उत्पादने सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.