Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता तरी जागे व्हा! किती बळींची वाट पाहणार?: अभियंता किरण मैंदड यांचा सरकारला थेट सवाल
सामाजिक

आता तरी जागे व्हा! किती बळींची वाट पाहणार?: अभियंता किरण मैंदड यांचा सरकारला थेट सवाल

किरण मैंदड यांनी त्यांच्या निवेदनात केवळ समस्या मांडल्या नसून, त्यावर ठोस उपाययोजनाही सुचवल्या आहेत-
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

ग्रामीण भागात आणि वनक्षेत्राच्या लगत राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्याचा वावर हा आता केवळ भीतीचा विषय उरला नसून तो जीवघेणा ठरत आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावत असताना, शासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अभियंता किरण सोमनाथ मैंदड यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांपासून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन धाडले आहे.

तंत्रज्ञान असतानाही दिरंगाई का?- आजच्या आधुनिक काळात जिथे आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांत करत आहोत, तिथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप्स’ आणि ‘मोशन सेन्सर’ यांसारख्या साध्या यंत्रणेचा वापर करण्यास शासन का कचरत आहे? असा प्रश्न किरण मैंदड यांनी उपस्थित केला आहे. जर वेळेत अलर्ट मिळाला, तर नागरिक सावध होऊ शकतात आणि अनेक निष्पाप जीव वाचू शकतात.

किरण मैंदड यांनी त्यांच्या निवेदनात केवळ समस्या मांडल्या नसून, त्यावर ठोस उपाययोजनाही सुचवल्या आहेत- 

⏩ मोशन सेन्सर आणि अलर्ट सिस्टीम: बिबट्या प्रवण क्षेत्रात मोशन सेन्सर लावून नागरिकांना तात्काळ पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारावी.

⏩ अतिसंवेदनशील क्षेत्र घोषणा: ज्या भागात हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे, तो भाग तातडीने ‘अतिसंवेदनशील’ म्हणून घोषित करावा.

⏩ गस्त आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम: शाळा, अंगणवाड्या आणि शेतवस्तीवर सकाळी व संध्याकाळी वनरक्षकांची गस्त वाढवावी.

⏩ प्रकाश व्यवस्था: शेतवस्ती आणि रस्त्यांवर सौर दिवे व उच्च क्षमतेची प्रकाश व्यवस्था बसवावी.

⏩ बफर झोन: ऊस आणि दाट पिकांच्या भागात बिबट्याला लपण्यास जागा मिळू नये म्हणून वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करावे.

ही केवळ मागणी नाही, तर जनआंदोलनाचा इशारा!- नागरिकांचे प्राण वाचवणे ही शासनाची मूलभूत घटनात्मक जबाबदारी आहे. केवळ पंचनामे आणि तोकडी मदत देऊन प्रश्न सुटणार नाही, असे सांगत मैंदड यांनी इशारा दिला आहे की, जर शासनाने या तांत्रिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात होणाऱ्या प्रत्येक मृत्यूला शासनच जबाबदार असेल. या मागणीकडे लक्ष न दिल्यास लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नेमकी परिस्थिती काय?- गेल्या काही दिवसांत संगमनेर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांच्या हल्ल्यात लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. दिवसा शेतात जाणेही आता कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत किरण मैंदड यांनी उचललेले हे पाऊल सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 466
किरण मैंदड बिबट्या समस्या आणि उपाययोजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.