Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेचे ‘रामकृष्ण सभागृह’ गजबजले; ५ मुख्याधिकाऱ्यांनंतर अखेर लोकशाहीचे द्वार उघडले! रामकृष्ण सभागृहात नव्या पर्वाचा श्रीगणेशा!
पत्रकारिता

संगमनेर पालिकेचे ‘रामकृष्ण सभागृह’ गजबजले; ५ मुख्याधिकाऱ्यांनंतर अखेर लोकशाहीचे द्वार उघडले! रामकृष्ण सभागृहात नव्या पर्वाचा श्रीगणेशा!

डॉ. मैथिली तांबेंच्या अध्यक्षतेखाली पहिली विशेष सभा; साडेचार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2026Updated:14/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर

प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर संगमनेर नगरपरिषदेचे राजकारण पुन्हा एकदा लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात परतले आहे. तब्बल चार-साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहाचे दरवाजे नवनिर्वाचित सदस्यांसाठी उघडण्यात आले. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे. या निवडीच्या निमित्ताने अनुभवी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रथमच सभागृहात पाऊल ठेवले, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची देखील या सभागृहात पहिलीच ‘एन्ट्री’ झाली. नगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान होत तांबे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करत पहिलीच विशेष सभा यशस्वीपणे पार पाडली.

​तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली होती. या साडेचार वर्षांच्या काळात नगरसेवकांसाठी बंद झालेली पालिकेची दारे आता पुन्हा एकदा खुली झाली आहेत. विशेष म्हणजे, या काळात संगमनेर पालिकेने पाच मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ अनुभवला. राहुल वाघ यांना सुरुवातीला कौन्सिलसोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र त्यानंतर आलेल्या रामदास कोकरे यांचा स्वच्छतेच्या बाबतीत राज्यभरात दबदबा असूनही, प्रशासक म्हणून काम करताना त्यांना मर्यादा आल्या. लोकप्रतिनिधींची (कौन्सिलची) साथ नसल्याने कोकरे यांना संगमनेरच्या कचरामुक्तीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही आणि ते राजकीय बळी ठरल्याच्या चर्चेसह त्यांची बदली कल्याण महापालिकेत झाली.

​या दरम्यानच्या काळात सतीश दिघे यांची अवघ्या काही तासांसाठी झालेली नियुक्ती आणि या काळात नेमके पालिकेत काय घडले हे गुलदस्त्यात असल्याने या मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या चर्चाही संगमनेरात रंगल्या होत्या. त्यानंतर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनश्री पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त पदभार, अशा अनेक घडामोडी घडल्या. अखेर विद्यमान मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना कामासाठी नवनिर्वाचित कौन्सिलची साथ मिळणार आहे. मंगळवारची ही विशेष सभा मुख्याधिकारी गोरे यांच्यासाठीही पहिलीच बैठक ठरली. आता साडेचार वर्षांनंतर सभागृहाचे टाळे उघडल्याने शहराच्या विकासाचे निर्णय पुन्हा एकदा याच रामकृष्ण सभागृहात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतले जाणार आहेत. अनेक माहितगार अधिकारी, कर्मचाऱ्यांची या काळात निवृत्ती झाल्याने संगमनेर शहराची फारशी माहिती नसलेले नवखे अधिकारी आता संगमनेरचा कारभार बघणार असल्याने या चार साडेचार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात पालिकेच्या प्रशासकीय इमारतीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 793
संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.