Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार; आता वाद नको, फक्त भगवा हवा! सचिन कोते यांचे शिवसैनिकांना आवाहन
राजकारण

संगमनेरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार; आता वाद नको, फक्त भगवा हवा! सचिन कोते यांचे शिवसैनिकांना आवाहन

​या रणसंग्रामात 'महाविकास आघाडी' म्हणून उतरण्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद आता कायमचे बाजूला ठेवा. आता वेळ आली आहे ती फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरण्याची! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा जोरदार विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
​आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सचिन कोते यांनी मुंबईतील शिवतीर्थावरील गर्दीचा दाखला देत सांगितले की, शिवाजी पार्कवर जमलेला जनसागर ही केवळ सभा नव्हती, तर ती संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारी गर्जना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आता मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
​या रणसंग्रामात ‘महाविकास आघाडी’ म्हणून उतरण्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात आले आहेत. शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आघाडी म्हणून लढण्यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत विनंती करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रस्तावामुळे संगमनेरच्या राजकारणात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील समन्वयाची चर्चा आता रंगू लागली आहे.
​तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गटबाजी आणि अहंकार बाजूला सारून पक्षाची ‘वज्रमुठ’ आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्व कडवे आणि एकनिष्ठ शिवसैनिक आहोत हीच आपली खरी ओळख असून, आगामी प्रत्येक राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे. नगरपालिकेप्रमाणेच आता पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्येही शिवसेनेच्या माध्यमातून परिवर्तन घडणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच बैठकीत तळेगाव भागाचे युवा सेना तालुकाप्रमुख सागर भागवत यांनी जिल्हा परिषदेसाठी आपली उमेदवारी जाहीर करत पक्षप्रमुखांचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य असल्याचे सांगितले.
​युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण आणि तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ यांनीही आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरले. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रावसाहेब गुंजाळ, अजीज मोमीन, आशाताई केदारी, सुनील देशमुख, प्रकाश क्षत्रिय, योगेश गुंजाळ, संदीप गुंजाळ यांच्यासह तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून शिवसेनेच्या या ‘रणशंखनादा’चा धसका विरोधकांनी घेतला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,069
बैठक शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

By Annant Ppangarkar10/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त…

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.