Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक निकाल न पटल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह नको; सत्यजीत तांबेंचा ‘युवा नेत्यांना’ सडेतोड टोला
राजकारण

निवडणूक निकाल न पटल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह नको; सत्यजीत तांबेंचा ‘युवा नेत्यांना’ सडेतोड टोला

केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीला मिळणारे यश आणि विरोधकांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक सूचक ट्विट करत राज्यातील ‘युवा नेत्यांचे’ कान टोचले आहेत. “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की, महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येत असताना अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. वास्तविक पाहता, निवडणुका हे जनतेने आपले मत मांडण्याचे सर्वोच्च स्वातंत्र्य आहे. मतदानाचा हक्क हे लोकशाहीने दिलेले सर्वात मोठे शस्त्र असून, त्याचा सन्मान करणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. केवळ निकाल विरोधात गेला म्हणून यंत्रणेवर संशय घेणे म्हणजे सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या कौलाचा अनादर करण्यासारखे आहे.

आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हटले आहे बघा…..

https://x.com/i/status/2012061430347092291

सत्यजीत तांबे यांनी पुढे असेही नमूद केले की, असे आरोप करून हे नेते आपल्याच पक्षातील त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि विजय मिळवला. लोकशाहीत संस्थात्मक स्वातंत्र्य आणि प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहणे गरजेचे आहे. पराभव स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आणि धैर्य असणे हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असून, निकाल स्वीकारण्याची परिपक्वता प्रत्येक नेत्याने दाखवायला हवी, असा स्पष्ट संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

सध्या राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये भाजप आणि महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. या यशानंतर विरोधकांमधील काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, राजकीय मतभेद असले तरी लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, असे ठाम मत तांबे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, युवा नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 927
ट्विट महापालिका निवडणूक निकाल सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.