संगमनेर, प्रतिनिधी –
गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी प्रवरा नदीपात्रात आढळून आल्याने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजीत बाळासाहेब पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका खासगी एनजीओ संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेत मृताची स्कुटी एका ठिकाणी आणि मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी संगमनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील हे गुरुवारी (दि. १५) नेहमीप्रमाणे आपल्या ज्युपीटर स्कुटीवरून (क्र. एम.एच. १८. बी.वाय. ०७७६) कामावर गेले होते. मात्र, दुपारी जेवणासाठी ते घरी परतले नाहीत आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे काळजीपोटी त्यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते, परंतु त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर तीन दिवसांनंतर, रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरातील जुन्या मोठ्या पुलाजवळ नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला.
नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता, तो अभिजीत पाटील यांचाच असल्याची खात्री पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांची स्कुटी नाशिक-पुणे महामार्गावरील कासारवाडी जवळील पुलावर लावलेली होती, तर त्यांचा मृतदेह तिथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या पुलाजवळ सापडला. गाडी एका ठिकाणी आणि मृतदेह लांब अंतरावर सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, सध्या शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. हा मृत्यू अपघाती आहे, त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे, या दिशेने पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
स्कुटी कासारवाडी पुलावर अन् मृतदेह जुन्या पुलाजवळ, अभिजीत पाटील मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी संगमनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.