Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा ८ फेब्रुवारी रोजी संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार; आमदार सत्यजीत तांबे यांची घोषणा
महाराष्ट्र संवाद विशेष

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा ८ फेब्रुवारी रोजी संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार; आमदार सत्यजीत तांबे यांची घोषणा

या विशेष गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी एक 'राजकारण विरहित सर्वसमावेशक गौरव समिती' स्थापन करण्यात येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा जपत लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव देशपातळीवर पोहोचवणारे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा अभूतपूर्व गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

तमाशा ही महाराष्ट्राची अस्मिता असून खेडकर यांनी या कलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. कांताबाई सातारकर यांच्यानंतर त्यांनी केवळ ही कलाच जपली नाही, तर तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्षपद भूषवून कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी यशस्वी लढाही दिला. आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावात जेव्हा पारंपारिक कला लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे, अशा काळात खेडकर यांनी विनोदी अभिनेता, सोंगाड्या आणि वगनाट्यातील प्रभावी अभिनयाच्या जोरावर तमाशा जिवंत ठेवला आहे. त्यांच्या विशेष अशा समई आणि थाळी नृत्याने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

संगमनेरची भूमी ही कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर आणि विठ्ठल उमप यांसारख्या थोर लोककलावंतांची कर्मभूमी राहिली आहे. या परंपरेत खेडकर यांना मिळालेला पद्म सन्मान हा केवळ संगमनेर शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच भावनेतून आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील सर्व नागरिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले आहे.

या विशेष गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी एक ‘राजकारण विरहित सर्वसमावेशक गौरव समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. रघुवीर खेडकर हे संगमनेरकरांचे लाडके ‘रघुभाऊ’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी स्थापन होणाऱ्या या समितीमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, जेणेकरून हा सोहळा सर्वांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरेल, असेही आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 565
नागरी सत्कार पद्मश्री पुरस्कार रघुवीर खेडकर सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.