Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोणीत शोककळा! चंद्रपूर साठवण तलावात बुडून ३ ‘एमबीए’ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र संवाद विशेष

लोणीत शोककळा! चंद्रपूर साठवण तलावात बुडून ३ ‘एमबीए’ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून तातडीने मदतीसाठी हाक मारली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने आणि वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या भीषण दुर्घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही उच्चशिक्षण घेणारे तरुण विद्यार्थी असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी केलेला आक्रोश अत्यंत हृदयद्रावक होता.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढले व घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या साठवण तलाव परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही पुरेशा उपाययोजना नसल्याची संतप्त चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. अशा धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने फलक लावणे किंवा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,765
एमबीए विद्यार्थी चंद्रपूर साठवण तलाव बुडून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  हिक्किम: जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध…

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.