Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील विठ्ठल मंदिर परिसरात नियोजित समाधी भूमीपूजन कार्यक्रमाला शिष्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आंदोलन छेडण्याचा इशारा
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमधील विठ्ठल मंदिर परिसरात नियोजित समाधी भूमीपूजन कार्यक्रमाला शिष्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आंदोलन छेडण्याचा इशारा

शिष्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाच्या वतीने वारसाहक्काबाबत मा. न्यायालयात आर.सी.एस. क्रमांक १६९/२०१५ अन्वये दावा दाखल करण्यात आलेला असून तो सध्या प्रलंबित आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

शहरालगतच्या अकोले-नाशिक बायपास रोडवरील विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिर आणि ह.भ.प. किसन महाराज हारदे आश्रमाच्या आवारात येत्या ३० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समाधी भूमीपूजन कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अनधिकृत असून त्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाने प्रशासनाला दिला आहे.

या संदर्भात मंडळाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिरात दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दिवंगत ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या समाधीचा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे फलक (फ्लेक्स बोर्ड) मंदिराचे गेट तसेच गावात इतरत्र लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फलकांवर हा कार्यक्रम ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाच्या वतीने आयोजित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, शिष्य मंडळाने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसून, काही अज्ञात व्यक्तींनी मंडळाच्या नावाचा गैरवापर करून हे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत आणि लोकांची दिशाभूल केली आहे, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शिष्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाच्या वतीने वारसाहक्काबाबत मा. न्यायालयात आर.सी.एस. क्रमांक १६९/२०१५ अन्वये दावा दाखल करण्यात आलेला असून तो सध्या प्रलंबित आहे. न्यायालयीन वाद सुरू असताना, केवळ वादग्रस्त जागेवर कब्जा मिळवण्याच्या सुप्त हेतूने काही अज्ञात व्यक्तींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचा संशय शिष्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर वादग्रस्त जागेवर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून ३० मे रोजी हा अनधिकृत कार्यक्रम होऊ दिला, तर ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाचे सर्व प्रतिनिधी, विठ्ठल मंदिराचे भक्त आणि संगमनेरचे स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने एकत्र येतील. या कार्यक्रमाला लोकशाही मार्गाने आणि निषेध आंदोलनाच्या माध्यमातून कडाडून विरोध केला जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची आणि कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत संगमनेरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, गुंजाळवाडीचे ग्रामसेवक आदींना देण्यात आली आहे. या निवेदनावर भारत ताजणे, सुभाष ताजणे, शाम अभंग, चंद्रकांत देशमुख, सोपान गाडेकर, नंदू शिंदे, रामनाथ बाळसराफ, अमोल ताजने, संजय अभंग, केतन मंडलिक, बाळासाहेब अभंग, मारुती अभंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या संवेदनशील प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,776
किसन महाराज हारदे भूमीपूजन कार्यक्रम वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.