Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काळ आला होता पण वेळ आली नव्हती! खताचा टेम्पो विहिरीत कोसळला; ४ जण सुखरूप
अपघात

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! खताचा टेम्पो विहिरीत कोसळला; ४ जण सुखरूप

​​या घटनेमुळे जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर सुरक्षिततेचे उपाय योजनावेत आणि संबंधित वळणांवर सूचना फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे एक मोठी वीज दुर्घटना टळली असून, टेम्पोमधील चौघेही जण बालंबाल बचावले आहेत.

​​सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक MH 41 AV 6183) कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर, उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.

​​अपघात झाला त्या ठिकाणी महावितरणचा मोठा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आहे. नियंत्रण सुटलेला टेम्पो या ट्रान्सफॉर्मरला अगदी घासून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. जर टेम्पोची धडक थेट ट्रान्सफॉर्मरला बसली असती, तर परिसरात वीज प्रवाह उतरून भीषण जीवितहानी झाली असती. मात्र, ट्रान्सफॉर्मर वाचल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला.

​​या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानू बाळाजी जाधव यांच्या घराच्या कोपऱ्याला धडकला, ज्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. त्यानंतर टेम्पो थेट दगडी बांधकाम असलेल्या विहिरीत जाऊन अडकला. विहिरीचे दगडी बांधकाम कोसळल्याने विहिरीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, टेम्पोमधील चालक आणि इतर तीन प्रवासी अशा एकूण चारही जणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

​​हा अपघात पहाटे ३ वाजता होऊनही चालक किंवा मालकाने याची माहिती पोलिसांना तत्काळ दिली नाही. सकाळी जेव्हा स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला, तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. माहिती देण्यास उशीर झाल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. शनिवारी सायंकाळपर्यंत हा टेम्पो विहिरीतच अडकलेल्या अवस्थेत होता.

​​या घटनेमुळे जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर सुरक्षिततेचे उपाय योजनावेत आणि संबंधित वळणांवर सूचना फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,190
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.