Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे संगमनेर प्रशासनाला कठोर आदेश
प्रशासन

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे संगमनेर प्रशासनाला कठोर आदेश

संगमनेर शहराच्या विकासाशी निगडित असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्र, ट्रक टर्मिनलचा प्रलंबित प्रश्न आणि एमआयडीसीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी सकारात्मक चर्चा केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत. 

संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अवैध व्यवसायांबाबत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना केल्या. वाळू तस्करांवर वचक निर्माण करण्यासाठी केवळ दंड न आकारता, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी कडक कायदेशीर कलमांचा वापर करावा, असे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. 

प्रशासकीय कामांच्या पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. साकुर व खंडेरायवाडी येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांनी रब्बी पिकांची ‘ई-पीक’ पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचे महत्त्व अधोरेखित करत, हे काम मोहीम स्तरावर आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या.

आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी साकुर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मियावाकी वन प्रकल्प आणि वनराई बंधाऱ्यांच्या कामांची गुणवत्ता तपासली. गावातील प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला भेट दिली असता, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच निमोण येथील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून भविष्यातील ऊर्जा गरजांच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले.

संगमनेर शहराच्या विकासाशी निगडित असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्र, ट्रक टर्मिनलचा प्रलंबित प्रश्न आणि एमआयडीसीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी सकारात्मक चर्चा केली. एमआयडीसीमधील पायाभूत सुविधा आणि उद्योगांना लागणारे सहकार्य याबाबत त्यांनी संबंधित विभागांना तातडीने पावले उचलण्यास सांगितले. या संपूर्ण दौऱ्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 545
जिल्हाधिकारी पंकज आशिया पाहणी बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.