Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रघुवीर खेडकरांचा ‘पद्म’ सन्मान म्हणजे तमाशा कलेला मिळालेले गतवैभव – बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

रघुवीर खेडकरांचा ‘पद्म’ सन्मान म्हणजे तमाशा कलेला मिळालेले गतवैभव – बाळासाहेब थोरात

एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी:

संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली. कांताबाई सातारकर यांच्या पश्चात तमाशा फडाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळण्यासोबतच, त्यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही अत्यंत कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे.

विशेष म्हणजे, केवळ रंगमंचावरील सादरीकरणच नव्हे तर तमाशा कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन झालेला हा गौरव संगमनेर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे. कलेशी असलेली निष्ठा आणि समर्पित आयुष्य जगणारे संगमनेरकरांचे लाडके ‘रघुभाऊ’ यांचा हा सन्मान प्रत्येक रसिकासाठी आणि कलाकारासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 659
पद्म पुरस्कार बाळासाहेब थोरात रघुवीर खेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.