Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अविश्वसनीय दुर्दैवी अंत: बारामतीत विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांचा मृत्यू
अपघात

अविश्वसनीय दुर्दैवी अंत: बारामतीत विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांचा मृत्यू

विमान उतरत असताना धावपट्टीजवळ एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे वादळ शमले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमानाचा आज बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अजित पवार आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास लँडिंग होत असताना विमानाला भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरत असताना धावपट्टीजवळ एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते.
नागरी विमानवाहू महासंचालनालयाने (DGCA) आणि पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
विदीप जाधव (मुंबई पीएसओ)
कॅप्टन सुमित कपूर (वैमानिक)
कॅप्टन शांभवी पाठक (वैमानिक)
पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)
विमानातील अन्य एक कर्मचारी.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात इतका भीषण होता की विमानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून बारामतीसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 775
अजित पवार विमान अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.