Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दहा वर्षांचा ‘क्राईम डेटाबेस’ ठरला गेमचेंजर; ३४ गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव ‘एसपी’कडे! संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे मधून या गुन्हेगारांचा समावेश…
गुन्हेगारी

दहा वर्षांचा ‘क्राईम डेटाबेस’ ठरला गेमचेंजर; ३४ गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव ‘एसपी’कडे! संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे मधून या गुन्हेगारांचा समावेश…

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा सविस्तर 'क्राइम डेटाबेस' तयार केला असून, त्याद्वारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३४ अट्टल गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राइम डेटाबेस’ तयार केला असून, त्याद्वारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारीच्या प्रस्तावातील गुन्हेगार___
श्रीरामपूर शहर व तालुका- योगेश सचिन गुंजाळ (२३ वर्षे, बेलापूर बुद्रुक), भारत विष्णू धोत्रे (३० वर्षे, तीन बाजारतळ), तंजील गफार खान (२५ वर्षे, हुसेन नगर), प्रशांत संजय थोरात (२७ वर्षे, शिरसगाव), मनोज यशवंत पवार (२४ वर्षे, टाकळीभान).
राहुरी विभाग- आरिफ गफुर शेख (३२ वर्षे, पिंप्री अवघड), अक्षय मच्छिंद्र कुसमुडे (वांबोरी), करण भारत माळी (एकलव्य वसाहत), योगेश सोपान बाचकर (बारागाव नांदूर).
कोपरगाव शहर व तालुका- वैभव मुकेश कुन्हाडे (२२ वर्षे, इंदिरानगर), अनिकेत गणेश जाधव (२५ वर्षे, गांधीनगर), योगेश सुरेश गायकवाड (२५ वर्षे, गांधीनगर), बापू दत्तू शोधक (३० वर्षे, सोनेवाडी), संदिप दादा काळे (२२ वर्षे, सुरेगाव).
शिर्डी व राहाता- संकेत आप्पासाहेब गव्हाणे (कालिका नगर, शिर्डी), संतोष बाबुराव शिंदे उर्फ शफ्या (शिर्डी), प्रशांत जनार्दन जाधव (सांईनगर, राहाता), प्रविण नानासाहेब वाघमारे (२८ वर्षे, पिंपळस), गोकुळ कारभारी मासाळ (रांजणगाव खुर्द).
संगमनर शहर व तालुका- शुभम बाळू गायकवाड (२० वर्षे, घुलेवाडी), सद्दाम मन्सूर शेख (२५ वर्षे, संगमनेर), संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या (अतरापगड वेल्हाळे), अमोल संजय जोंधळे (गुंजाळवाडी), सुयोग अशोक देवांगे (२२ वर्षे, हिवरगाव पावसा), सत्यम भाऊसाहेब थोरात (वडगाव पान) आण्णासाहेब सूर्यभान वाडगे (४५ वर्षे, घारगाव).
अकोले-  जनार्दन कमलाकर नवले (४४ वर्षे, नवलेवाडी, अकोले).
नेवासा-  धनंजय सुनील काशीद (नेवासा बुद्रुक), टोळी प्रमुख: शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे (२१ वर्षे, वडुले) व टोळी सदस्य: आकाश उर्फ दत्तू सावंत आणि योगेश मच्छिंद्र सावंत, दिलीप दत्तात्रय शेलार व इतर (नेवासा), यासीन गणी शेख (सलाबतपूर, नेवासा).
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. यामध्ये गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचा प्रकार (शरीरांविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध, अंमली पदार्थ) आणि त्यांची गुन्हे करण्याची पद्धत यांची सविस्तर नोंद आहे. यामुळे वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर अंकुश बसवणे सोपे झाले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर), अमोल भारती (शिर्डी), कुणाल सोनवणे (संगमनेर), निरज राजगुरू व विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

📌 समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हेगारांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील.
— सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,398
अहिल्यानगर पोलीस तडीपार प्रस्ताव श्रीरामपूर विभाग सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.