Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंदिरातील चांदीच्या पादुका चोरणारे त्रिकुट संगमनेर तालुका पोलीसांकडून जेरबंद; घाटातील लुटीचीही उकल! १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

मंदिरातील चांदीच्या पादुका चोरणारे त्रिकुट संगमनेर तालुका पोलीसांकडून जेरबंद; घाटातील लुटीचीही उकल! १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

धक्कादायक बाब म्हणजे, याच आरोपींनी चंदनापुरी घाटात एका बंद पडलेल्या गाडीच्या चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची कबुली देखील दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

चंदनापुरी (संगमनेर) येथील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीच्या पादुका आणि एका भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या पादुकांसह, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, २९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ च्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराचे कडी-कोयंडा उघडून पालखीतील चांदीच्या पादुका चोरून नेल्या होत्या. तसेच परिसरात झोपलेले साक्षीदार संजय गाडेकर यांचा मोबाईलही लंपास केला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा कोणताही धागादोरा नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला.

या तपासादरम्यान संशयित आरोपी श्रीरामपूर येथील एकता चौक परिसरात ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथे सापळा लावून प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर), रोहित विठ्ठल साळवे (रा. सिन्नर, नाशिक) आणि अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, याच आरोपींनी चंदनापुरी घाटात एका बंद पडलेल्या गाडीच्या चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची कबुली देखील दिली आहे.

आरोपींनी चोरलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या ३६० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका संगमनेर येथील सोनार सिद्धेश संदीप महाले याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या पादुकांसह ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. एम.एच.१२ एल.के. ९०७६), २० हजार रुपयांचा मोबाईल आणि २ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. वाय. टोपले करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,469
गुन्हेगारी टोळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.