Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली सलीम-अलीम टोळी जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली सलीम-अलीम टोळी जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना जागीच पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि मोटारसायकल मिळून आल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर शहर आणि परिसरात अनेक घरफोड्या व जबरी चोऱ्या करणाऱ्या कलीम-अलीम टोळीचा संगमनेर शहर तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात दिनांक १ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री २३:०० वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे ०२:३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या टोळीला रंगेहात अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे हे शासकीय वाहनाने रात्रगस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोल्हेवाडी रोड लगत काही इसम मोटारसायकलवर अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या साहित्यासह फिरत आहेत. बातमी मिळताच पोलिसांनी पंचांना बोलावून सापळा रचला. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना जागीच पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि मोटारसायकल मिळून आल्या.

या कारवाईत पोलिसांनी सलीम अकबर पठाण (वय २६, रा. जमजम कॉलनी), अलीम अकबर पठाण (वय २४, रा. जमजम कॉलनी), वसीम मन्सुर शेख (वय ३८, रा. मदिनानगर), निलेश बाळासाहेब शेळके (वय ४०, रा. रोहमवाडी), सलमान अकबर पठाण (वय २४, रा. कोल्हेवाडी रोड) आणि अनमोल कुरनवाशी चव्हाण (वय १९, रा. घुलेवाडी) या सहा जणांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून ४०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (MH17DD0183), ६०,००० रुपये किमतीची विना नंबरची होंडा शाईन, ४५,००० रुपये किमतीची प्लॅटिना मोटारसायकल आणि एकूण चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच झडतीमध्ये एक लोखंडी गुप्ती, दोन कोयते, पकड, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कुऱ्हाड आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारी मिरचीची पूड असा एकूण १,७६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, संतोष पगारे, बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, राहुल शिवाजी क्षीरसागर, सागर मच्छिंद्र नागरे, राहुल कैलास पांडे, विजय तबाजी आगलावे आणि चालक लक्ष्मण दत्तु खेडकर यांच्या पथकाने यशस्वी केली.

या प्रकरणी पोकाँ विजय आण्णा खुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ११८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,202
टोळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.