Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनैतिक देहविक्रय व्यवसायासाठी वापर; ‘लॉज’वर पोलिसांची मोठी कारवाई; लॉज एका वर्षासाठी सील
गुन्हेगारी

अनैतिक देहविक्रय व्यवसायासाठी वापर; ‘लॉज’वर पोलिसांची मोठी कारवाई; लॉज एका वर्षासाठी सील

या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – 

श्रीरामपूर शहरातील ‘आदर्श लॉज’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, अनैतिक देहविक्रय व्यवसायामुळे हे लॉज एका वर्षासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती दिली.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ‘आदर्श लॉज’ येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक आणि पंचांच्या उपस्थितीत सदर लॉजवर छापा टाकला. या छाप्यात लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५ वर्ष, रा. रंगोली रोड, श्रीरामपूर) याला रंगेहात पकडण्यात आले. तसेच या ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

लॉज मॅनेजर धीरज बिंगले आणि त्याचा साथीदार अहमद शेख (रा. बावरपुरी, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर – सध्या फरार) हे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रय करून घेत होते. असे तपासामध्ये समोर आले होते. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले. सदर लॉजच्या चालकांनी यापूर्वीही अशाच प्रकारे महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढले होते. यापूर्वी १० जानेवारी २०२४ रोजी देखील या लॉजवर छापा टाकून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तरीही लॉज चालक व मालक यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. हे लॉज श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर, नुराणी मस्जिद आणि शाळा-कॉलेजच्या परिसरात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी आणि भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदर्श लॉज जप्त करण्याबाबत नोटीस बजावली होती, परंतु आरोपींकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने उपविभागीय दंडाधिकारी यांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर लॉज एका वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले.

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस शिपाई आजीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकळे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र कातखडे आणि महिला पोलीस शिपाई मिरा सरग यांच्या पथकाने केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,075
आदर्श लॉज लॉज सील सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.